Monday, May 16, 2011

' घरचा ओसामा...?'

 

 

"US KILLS OSAMA, BLOWS PAK COVER", "Justice done say kin of 9/11 victims" जिथं  पहावं तिथं ओसामा बिन लादेनच्या मृत्यूची चर्चा. जगभर ओसामाच्या मृत्यूचा जल्लोष. सर्व सामान्य घरात सुद्धा हीच चर्चा. दोन दीवसा पूर्वीच, " अगं तू ऐकलंस का? ओसामा गेला" हि टी.व्ही. वर ताजी बातमी ऐकून सासूबाई सांगायला आल्या. इंटरनेट आणि हल्ली 'Facebook' मुळे बातम्या प्रचंड वेघाने पसरतात त्यामुळे ओसामाच्या मृत्यूची बातमी टी व्ही न पाहता माझ्या काना पर्यंत आधीच पोहोचली होती. एका ओसामाचा मृत्यू, U.S.A पासून भारता पर्यंत साजरा होतो आहे खरा परंतु एक ओसामाचा वध करून आपण आतंकवादाचा अंत करू शकतो का? एका ओसामाच्या जागी आता पर्यंत दहा ओसामा तयार झाले असतील. ह्या दहशतवादाला अंत नाही. पैसा, सत्ता आणि प्रसिद्धी, हे कोणाला नको??? जो तो ह्या त्रिकुटाच्या मागे झगडताना आढळतो. 

 

 जिथे पाहावे तिथे सत्त्ते साठी भुकी माणसं आपलं वर्षास्व दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. वर्चस्व दाखवायला 'ओसामाच' बनायची गरज नाही, आपल्याला बर्याच घरा मधे सुद्धा ओसामा आढळून येतील. अर्थात ते आतंकवादी नाहीत परंतु सत्ताधारक तरी नक्कीच आहेत. घरोघरी असलेल्या ह्या 'ओसामा' ची विविध रूपं ' ऐकता कपूर' आपल्या ' क.......' च्या धरावाहीकांच्या माध्यमातून आपल्याला इतकी वर्ष दर्शवत आली आहे आणि ऐकता कपूर कढून प्रेरणा घेऊन हल्ली मराठी धारावाहिक सुद्धा त्याच आदिशक्तीच्या जोरावर आपले TRP's वाढवत आहेत. कोणत्याही प्रकारचा कलह घडण्या मागे त्या एका कार्यास्थानी व्यक्तीचा हाथ असतो आणि ती म्हणजे 'स्त्री' !!! 

 

जर ओसामा एक स्त्री असता तर आता पर्यंत नक्कीच जगाला आपल्या ताब्यात केलं असतं. सगळ्या वहीनीनवर स्त्री ची प्रतिमा आणि भूमिका एक सारखीच दर्शवतात हे माझ्या ऐकिवात आले आहे पण त्या मागे काहीतरी तथ्य असल्या शिवाय नाही. त्या 'IDIOT BOX' पासून मी दहा हाथ लांब असते खरी परंतु त्यात चाललेल्या घडामोडी कोणत्या न कोणत्या मार्गाने ऐकण्यात येतात. एका 'स्त्री' कडे जेवडे शास्त्र आहेत तेवडे कदाचित ओसामा कडे सुद्धा नसतील. सर्वात मोठे शास्त्र आहे तिची कार्यस्थानी बुद्धी आणि दुसरे म्हणजे अश्रू ....  ज्याच्या जोरावर ती आपली सत्ता स्थापित करीत असते. एखाद्या कमकुवत नवर्यावर ह्या दोन शास्त्राचा वापर ती अतिशय सहज रित्या वापरते. परंतु नवरा जर तिच्यापेक्षा प्रभावी असला तर ती तिचे सामर्थ्य व्यर्थ नाही घालवत परंतु तेच उपयोगात आणायला ती इतर माध्यम स्वीकारते. तिचे इतर लक्ष्य म्हणजे घरातील इतर व्यक्ती, किंव्हा कोणीच जर सापडले नाही तर आजू बाजूच्या घरात डोकावून त्यांच्या घरात आपली कार्यस्थाने रचायची. परंतु ती आपली सामभाव्याक्ता कुठेही कमी होऊ देत नाही.  

 

'ओसामा बिन लादेन' असो किंव्हा हा 'घरचा ओसामा' .... शेवटी एका बाबतीत अगदी सारखे ... कार्यास्थानी !  हल्लची लग्न मोडण्यामागे स्त्री चा वाटा कदाचित पुरुषानपेक्षा अधिक आहे असा म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कारण बायको म्हणून जरी तिने आपलं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला नाही तरी आच्या युगात सुद्धा 'सासूचा' वर्चस्व आहे हि वस्तूस्तीती आहे. अशा गोष्टी कानी पडल्यावर आश्चर्य वाटतं कारण आपल्या आजू बाजूला आपल्याला असे काही आढलताना दिसत नाही परंतु आपल्याला किती घरातली 'अंदर कि खबर' माहिती असते? ती उधळली जाते आपल्या ' Family Court' च्या गाभार्यात. तेव्हा 'स्त्री' ची दुसरी बाजू पहायला मिळते. जे ' ऐकता कपूर'  दर्शवते त्यात काहीतरी तथ्य आहे ह्यावर विश्वास बसायला लागतो. कैकेयी, मंथरा मुळे रामाला वनवास गाठावा लागला. सीते मुळे रामायण घडलं. 'दौपदी मुळे 'महाभारताचा महायुद्ध घडला. ' ' चा 'मा' करणाऱ्या आनंदीबाई होल्कारच होत्या नाही का? अर्जुनाला सुद्धा शिखंडीच्या मदतीमुळे भीष्माचा वध करता आला. राक्षसांचा सर्वनाश करायला सुद्धा त्या परमेश्वराला स्त्री रूपी महादेविलाच अव्तरावाच लागलं. शेवटी तात्पर्य काय??? प्रत्येक घडामोडी मागे स्त्रीचा हाथ असतो. 

 

असो! परंतु अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात येण्यामागे  एकच  कारण आहे आणि ते म्हणजे आपले 'भोग' जे आपल्याला भोगावेच लागणार. सगळा हिशोब त्या परमात्म्याकडे आहे जोः आपल्याला आपल्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकवतो. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी धडा शिकवून जाते आणि त्याच करणासाठी आपला जन्म होतो कारण हे आपले पुर्व्र जन्माचे भोग आहेत जे आपण निरनिराळ्या तारेने भोगत असतो. 

 

प्रत्येक नाण्याला जश्या दोन बाजू असतात तसेच ह्या ' घरच्या ओसामा' ला सुद्धा दुसरी बाजू आहेच. तिच्या शिवाय घरचं एक पान सुद्धा हलत नाही. नवर्याची, मुलांची, घराची आणि एका कुटुंबाला लागणाऱ्या सर्व जबादार्या सांभाळायला ती समर्थ आहे. आज स्त्री एका पुर्षाच्या बरोबरीने चालत आहे आणि असं कोणतही मध्यम नाही जिथे ती आपलं कौशल्य दाखवू शकत नाही. जशी पंत प्रधानाची महत्वपूर्ण जबाबदारी श्रीमती इंदिरा गांधीने बखूबी निभावली तर दूसर्या बाजूला फ्लोरेंस नाय्तिंगेल आणि मदार तेरेसा नि आपल्या प्रेमळ, निस्वार्थी स्वभाव आणि बलिदानामुळे आपली छबी ह्या पृथ्वी तालावर सोडली.  आजच्या आपल्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील असो किंव्हा  NASA च्या Space shuttle मधून जाणारी कल्पना चावला असो. आजची स्त्री पुर्षाच्या बरोबरीने चालत आहे आणि प्रत्येक जबाबदारी यशस्वी रीत्ये सांभाळायला पूर्णतः समर्थ आहे. अशी हि 'स्त्री',  "जसं घडवू शकते तसच बिघडवू पण शकते" म्हणून प्रत्येक स्त्री नि जर आपल्यातला अहंकार, आपल्यातला 'ओसामा' बाहेर कढून टाकला तर पत्येक ' घरच्या ओसामा' चा वध व्हायला वेळ लागणार नाही.