मनुष्याचा पापाचा घडा भरलाय आणि अंत
आता फार लांब नाही. एखाद्या सुंदर घराला वाळवी लागल्या प्रमाणे मनुष्य जातीने ह्या सुंदर पृथ्वीचा नाश केला
आहे. हि जग बुडी पहिली न्हावे. ह्या आधी सुद्धा जगबुडी घड्ली ज्यात सर्वच नाश झाला
आणि पृथ्वीवर घडवलेले सर्व शोध आणि त्या मागची तर्क नष्ट झाले आणि मनुष्याला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली. रामाच्या काळात सुद्धा विमान
होते. त्या नंतर महाभारताच्या काळात 'live telecast' T.V. वर पाहून संजय धृतराष्ट्राला युद्धाचे हाल कळवत असे. युद्धात atom bomb वापरले गेले होते. त्या सुमारास जी कलियुगाला
सुरुवात झली, त्या युद्धा नंतर एक प्रकारची जग्बुदीच झली. सर्व
शोधांचा नाश झाला आणि मनुष्याला पुन्हा सुरुवाती पासून शोध सुरु करावा लागला. हे एक चक्र आहे कारण आपले भोग आपल्याला ह्या जन्ममृत्यू खेळातून कधीच
सोडणार नाही. जिथे मृत्यू तिथे जन्म. अंत
हा शब्दच मुळात चुकीचा आहे कारण कोणत्याही अभौतिक गोष्टीला अंत नाही. अंत होतो तो केवळ भौतिक
सुखाचा. आत्म्याला मरण नाही त्यामुळे जो पर्यंत आत्मा जिवंत आहे ह्या जगाला मरण नाही. एक पर्व संपून दुसर्या
पर्वाची सुरुवात आपण आनंदाने स्वीकारू कारण कोणत्याही नवीन गोष्टीचे स्वागत हे व्हायलाच हवं नाही का? जगबुडी हि होणारच
पण आपुन आपले आयुष्य हवं तसं जगण्यासाठी त्या शेवटच्या दिवसाची का वाट पहावी? आजचा दिवस आपला, उद्याचा दिवस
कोणी पाहिलाय? ह्या क्षणासाठी जगावे पुढला क्षण तरी कोणी पाहिलाय??? आज आपण प्रत्येक माणूस
केवळ धावताना पाहतो. स्वतःसाठी जगताना पाहतो. मुलाचा जन्म होतो, परंतु
जन्मदात्यानकडे त्या बाळाला वेळ द्यायला वेळ नाही, नोकरीत वरची पायरी गाठायची असेल तर हे
बलिदान फारच शूलक . शेवटी प्रत्येकाचा अग्रमान म्हणजे आपल्या परिवाराचे भवितव्य. परंतु ह्या
खेळात आपण काही गमावत आहोत का?? वेळ हा कोणाच्याही सत्तेत नसतो उलट मनुष्य
हा 'वेळेच्या' मुठीत आहे. मुल जेव्हा लहान असतं त्याला आपल्या आई वडिलांच्या सोबतीची गरज
असते परंतु कार्कीर्दाच्या चक्रात अडकलेला माणूस कितीही हवं असून सुद्धा आपला वेळ आपल्या
मुलांना देऊ शकत नाही. ह्या गोष्टीची अतिशय खंत होते हि वेळ निघून जाते आहे हे आपल्या
लक्षातही येत नाही. आज इच्छा असते कोणाला भेटावं ते उद्यावर ढकलू नये कारण 'क्या पता कल हो न
हो'. बरीच लोकं
उपवास ठेवतात. आज एकादशी, उद्या संकष्टी, परवा हे... तेरवा
ते... कोणाचाही अनादर न करता एक उपरोधि विचार मनात आला.
उपवास का करावा? किव्हा लोकं उपवास का करतात? देवाला प्रसन्ना करायला? आपल्या पापाचे
प्रायश्चीत करायला कि एक दिवस आल्या पोटाला आराम देऊन आपले शरीर स्वच्छ करायला? तिसरे कारण पटण्यासारखे आहे परंतु
आधी दोन करणं न पटणारी आहेत. उपवासाच्या दिवशी इच्छा झालीच काही खाण्याची तर इच्छा मारून उपवास केला तर काय पुण्या कमावले जाते का? दूसर्या दिवशी
जगबुडी होणार आहे हे काळ्यावर सुद्धा लोक उपावास करतीलच का?? मनसोक्त जगायची इच्छा होणार नाही का? कि लोक घाबरूनच
जेवण सोडतील? आजचा मरण उद्यावर ढकलण्याची जी सवय
आपल्या प्रत्येकाच्या रक्तात भिनली आहे ती दिसून आली. संत कबीराचा दोहा आपल्याला
माहिती असून सुद्धा कोणी ते शब्द अमलात आणत का ? “काल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय
होएगी बहुरी करोगे कब !” संत कबिरांच्या शब्दांचे भाषांतर केले कि ते म्हणतात, " उद्याचे काम आज करावे आणि आजचे आता. आजचा क्षण जर गमावला तर काम
कसे होईल? माणसाच्या ह्याच प्रवृत्तीमुळे कोणतेच
काम वेळेत होत नाही आणि वेळेचे महत्व आणि किंमत आपल्याला जाणवत नाही. करोडच्या व्यापाराचा
सौदा करताना एका व्यापाराला त्या क्षणाचे महत्व कळते, शेयर मार्केट
मध्ये पुंजी धारकाला क्षणाचे महत्व कळते
परंतु त्याच व्यक्तींना अशा ठिकाणी आपला वेळ घालवता येईल जिथे त्यांना कसलाही पैसेविषयक लाभ नाही??? एका बाजूला
करोडचा लाभ आणि दूसर्या बाजूला आपल्या परिवार आणि हितचिंतक बरोबर घालवलेल्या वेळेशी तुलना. किती लोक त्या करोडच्या फायद्याला
नकार देऊन आपल्या मित्र परिवारा बरोबर आपल्या वेळ घालवणे पसंत करतील?? हा लेख लिहिताना मी आज स्वतः माझ्या ह्या पृथ्वीतलावरच्या शेवटच्या दीवसाचे क्षणचित्र डोळ्या समोर
पहाते आहे. फारच आनंदाचा दिवस असेल तो. काय करू
आणि काय नाही असा विचार मनात नाही येणार कारण शक्यतोवर मी माझं आयुष्य ह्या क्षणासाठीच जगते. उद्याचे मला माहित नाही, आज मी जिवंत आहे
त्यामुळे हि वेळ माझ्या जवळच्या व्यक्तींबरोबर घालवणे पसंत करते. पूर्ण
आयुष्याचा आनंदा त्या एका क्षणात उपभोगते. जी व्यक्ती आवडते त्या व्यक्ती बरोबर वेळ घालवते, मग ते प्रत्यक्ष
भेटून असो किंव्हा इतर माध्यमातून. माझा नवरा, माझी मुलं, माझा परिवार, माझे हातावर
मोजण्या एवडे मित्रमैत्रिणी आणि माझे हितचिंतक हा माझा छोटासा परिवार जो माझ्या
बरोबर सतत असतोच. त्यामुळे नवीन असा काही
नाही पण आयुष्याचा शेवटचा दिवस मी माझ्या ह्या छोट्याश्या परिवाराला घेऊन एकत्र घालवणं पसंत करीन आणि आपले पूर्ण आयुष्य
त्या शेवटच्या २४ तासात उपभोगीन. |