कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित होत असला की एक महिन्या आधी पासूनच आमच्या घरी त्याची चर्चा सुरु होते.
चित्रपटाच्या गोष्टी म्हटल्या की माझे
कान नकळतच बंद होतात आणि ते शब्द बंद कानावर जणू आदळत
असतात. तरी एखादा चित्रपट चांगला असेल असा वाटले तर मी स्वतः तो पाहण्यासाठी आतुर
असते. कधी आपल्याला एखाद्या नायक
किव्हा नायिके साठी तो चित्रपट पहावासा वाटतो तर कधी एखाद्या दिग्दर्शका साठी तर
कधी एखाद्या
मोठय निर्मिती गृहाच्या
नवामुळे आणि
जेव्हा ह्या सगळ्याच गोष्टी एकत्र येतात तेव्हा उत्साह द्विगुणीत होतो.
'तात्या
विंचू' परत
येतोय! ही घोषणा गेले काही वर्ष ऐकल्या
पासूनच मराठी
चित्रपट पाहणाऱ्या शोत्यांच्या मनात एक
उत्सुकता आणि खळबळ चालू झालेली. काही चित्रपट असतात ज्यातली पात्र लोकप्रिय होतात आणि त्या
पात्रांची नावे अजरामर
होतात. गब्बर सिंग म्हणा किंव्हा विजय
दिनानाथ चौहान, मोगाम्बो
असो किव्हा शाकाल, लहानान
पासून मोठ्यान पर्यंत प्रत्येकाला ह्या पात्रांची ओळख आहे. तसेच आपले 'तात्या विंचू' आणि 'कुबड्या खवीस'. जर 'गब्बर
सिंग' चा
खौफ हिंदी सिने सृष्टीत
आहे तर मराठी सिने सृष्टीत 'तात्या
विंचू' चा राज आहे. अशी पात्र निर्माण करून
लोकां पर्यंत पोहोचवणं सोप्पी गोष्ट नाही आणि जरी ती लोकां पर्यंत पोहोचवली तरी
त्या पात्रांना एक जिवंत रूप देऊन श्रोत्याच्या आयुष्याचा भाग बनवणं अजूनही कठीण.
पात्रांना जिवंत स्वरूप आणून आपल्या आयुष्याचा भाग बनवणे दिग्दर्शकाचे काम आहे आणि
ते यशस्वी पणे साधलाय आपल्याच महेश
कोठारे यांनी.
सतत काहीतरी नवीन करण्याचे धाडस महेश कोठारे करत
असतात आणि त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून एक तांत्रिक प्रगती दिसून येते.
मारठी सिने
सृष्टीला महेश कोठारे यांचे बरेच मोठे योगदान आहे आणि १९८५ पासून
त्यांनी जी
चळवळ चालू केली आहे, त्या
चळवळीने संपूर्ण
महाराष्ट्र आता
झपाटून गेला आहे. अतिशय अभिमान वाटतो हे घोषित करताना की मराठी
सिने सृष्टीला पहिला ३
डी चित्रपट देणारे आपले महेश कोठारे आहेत. 'झपाटलेला
२' हा
उत्तम दर्ज्याचा उत्कृष्ट
सिनेमा असून केवळ दोन आठवड्यात ५ करोड च्या वर धंदा केले आहे.
महेश कोठारे यांच्या नवा खाली अजून
एक विक्रम नोंदण्यात गेलाय आणि
तो म्हणजे 'झपाटलेला
२' हा
चित्रपट तिसर्या आठवड्यात सुद्धा २४० 'स्क्रीन्स
वर प्रदर्शित केला गेला.
धूम धडाका पासूनचे त्यांचे सर्व चित्रपट यशस्वी झालेच होते. दे दाणादाण, थरथराट, धडाकेबाज, झपाटलेला, खतरनाक, पछाडलेला, खबरदार सारखे असे अनेक चित्रपट आपल्याला देऊन महेश
कोठारे यांनी आपला एक वेगळाच ठसा उमटवला आहे. एक आघाडीचा चळवळीचा दिग्दर्शक म्हणून त्यांचे
नाव मराठी सिने सृस्तीतच न्हावे तर हिंदी सिने सृष्टीतही आदराने घेतले जाते. महेश कोठारे
यांनी मराठी सिने सृष्टीला पहिला सिनेमास्कोप
चित्रपट 'धडाकेबाज' ह्याची निर्मिती आणि दिग्दर्शन करून दिला.'चिमणी पाखरे' चित्रपटातून
त्यांनी प्रथमच मराठी सिनेमात डॉल्बी डिजिटल ध्वनी मुद्रण आणले. संगणकाचा उपयोग करून एका वेगळ्या पद्धतीने
चीत्रीकरण करून महेश कोठारे यांनी 'पछाडलेला' ह्या चित्रपटाला एक उच्च तांत्रिक दर्जा दिला जो
मराठी सिने सृष्टीत पहिल्यांदाच पाहिला गेला
आणि आता ' झपाटलेला
२' मध्ये
उच्च दर्ज्याचे ३ डी टेक्निक आणि संगणक ग्राफिक्स चा उत्तम उपयोग केलेला दिस्तो.
मित्रानो, आता
'महेश
कोठारे' म्हणून
महेश कोठारेंचे संबोधन
इथेच संपवते बरं का? इतका वेळ मी केवळ एक उत्कृष्ट निर्माते आणि
दिग्दर्शक 'महेश
कोठारे' बद्दल
बोलत होते ज्यांच्या बद्दल असंख्या
टी. व्ही. वाहिनी आणि
असंख्य मासिक, वूत
पत्रात म्हटले गेले आहे. आपल्याला सर्वाना त्यांची खाय्ती माहीतच आहे आणि मी काही
नवीन सांगत नाहीए. परंतु सांगितल्या शिवाय राहवत सुद्धा नाही. इतर त्यांना महेशजी, कोठारे साब, किव्हा
महेश सर म्हणून संबोधित करत असतील
आणि त्यांच्या बद्दल खूप काही लिहिले सुद्धा असेल. परंतु ह्या पुढे मी तसे करणार नाही. कारण येव्डेच
की ते आपल्या परिवाराचा हिस्सा आहेत आणि आपल्या माणसांना आपण घरच्या माणसां सारखेच संबोधिले पाहिजे, नाही का? मी
त्यांच्या पुढे बरीच लहान असल्यामुळे ह्या
पुढचा उल्लेख महेश मामा म्हणूनच करावासा वाटतो.
७ जुन २०१३ ला 'झपाटलेला
२' प्रदर्शित
झाला आणि दुसर्या दिवसा पासूनच 'फेसबुक' वर महेश मामानी मराठी श्रोत्यांना झपाटून टाकल्याची
बातमी कळली. मी चित्रपट प्रेमी नसून सुद्धा महेश मामाचा चित्रपट पाहणे माझ्या साठी अत्यंत गरजेचे होते. मुलांना घेऊन दुपारच्या शो
ला गेले. अपेक्षा भरपूर होत्या ह्या चित्रपटातून परंतु चित्रपटाच्या सुरुवाती पासून एक समीक्षक म्हणून
त्या चित्रपटाकडे पाहत होते. कोठारे परिवाराच्या प्रत्येक सिनेमाला मी कायम एका समीक्षकेच्या नझरेतून पहिले
आहे आणि त्यातले गुण दोष कळवले आहेत. त्यामुळे चित्रपट सुरु होताच माझ्यातली
टीकाकार जागी झाली परंतु पहिल्या प्रवेशानीच आपला ठसा उमटवला. 'कुबड्या खवीस' चा
त्या संग्रहालयात ला ३ डी प्रवेश उत्कृष्ट होता. त्या पुढे अपेक्षा वाढत गेली आणि ती महेश मामानी पूर्णपणे सार्थ केली.
कसलीच कमी वाटली नाही आणि चित्रपट गृहात आलेयांची सकारात्मक प्रतिक्रिया ऐकून त्यांचा अधिकच
अभिमान वाटू लागला. मुलांना सुद्धा
चित्रपट इतका आवडला
की घरी
आल्या बरोबर बाबांनी सुद्धा पहिलाच पाहिजे म्हणून रात्रीच्या
शो ला जाऊ असा आग्रह चालू होता. हीच खासियत असते महेश मामाचं चित्रपटांची कि ते
सर्व वयोगट मजेत पाहू शकतात आणि कितीही वेळा पहिले तरी तेव्दाच आनंद लुटू शकतात.
ह्या चित्रपटात अजून एक महत्वाची गोष्ट होती जी मला
पाहण्यात उत्सुकता होती आणि ती म्हणजे
आदिनाथ कोठारे ची भूमिका आणि त्याचे काम. आदि चे प्रत्येक काम मी पाहिले आहे आणि त्याची अभिनयाची
स्वाभाविक कल सुद्धा पाहिली आहे.
परंतु प्रत्येक नवीन नायकाला आपले स्थान कायम ठेवायला असंख्य अश्या परीक्षा
द्याव्या लागतातच. आदिचा प्रवास बरीच वर्ष चालू आहे आणि त्याच्या प्रगतीचा ठसा तो त्याच्या
प्रत्येक भूमिकेतून देत
आलाय. त्याची हीच प्रगती प्रत्यक्षात पहायची होती आणि अभिमान वाटतो हे घोषित
करताना कि आदिनाथ कोठारे यांनी 'झपाटलेला
२' मध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे आणि एक 'chocolate boy' म्हणून प्रत्येक तरुणीच्या मनात
घर करून गेला आहे.
तरुण मुलीच कशाला, लहान मुला मुलीन कढून सुद्धा
आदिनाथ कोठारे चे नाव ऐकून बरे वाटते. अतिशय
देखणा त्याच बरोबरीने सोज्वळ असे व्यक्तिमत्व
असलेला आदि ह्या सिने सृष्टीत स्वतःचा अस्तित्व कयाम करेल ह्याची खत्री आहे. 'ऑल ध बेस्ट' सारख्या
यशस्वी नाटकाचे
असंख्य प्रयोग
करून आदि ने कॉमेडीची
timing बर्या
पैकी साधली. चित्रपटाच्या शेवटी आदि आणि तात्या विंचू ची लढाई अतिशय सुंदर रीत्ये चित्रित केली आहे आणि त्यात आदिचे विशेष कौतुक करावेसे वाटते. आपल्या मराठी सिने सृष्टीला ज्या
नायकाची कमी भासत होती ती आता आदि पूर्ण करेल ह्यात शंका नाही.
टी .व्हि. वरच्या एका मुलाखतीत महेश मामा आणि आदि ला
मराठी सिने सृष्टीतले अमिताभ
- अभिषेक म्हटले गेले. परंतु मी ह्या मताशी सहमत नाही. महेश मामा एक अप्रतिम
दिग्दर्शक आहे ज्याला उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून फिल्म फ़ैर, स्क्रीन आणि महाराष्ट्र
राज्य चे विविध पुरस्कार
मिळाले आहेत. २००९ साली मराठी सिने
सृष्टीला लक्षणीय योगदान केल्या बद्दल
महाराष्ट्र राज्याने महेश कोठारेंचा गौरव केला. त्यामुळे एक उत्कृष्ट निर्माते
दिग्दर्शक म्हणून त्यांचे नाव घेणे योग्य ठरेल आणि राज कपूर, मनमोहन देसाई, ह्रीशिकेश
मुखर्जी सारख्या दिग्दर्शकांच्या नवा बरोबर त्यांचे नाव घ्यायला काहीच हरकत नाही.
महेश मामा नी मराठी
सिनेमात अजून
एक लक्षणीय वेगळेपणा केला. त्यांनी त्याच्याच चित्रपटाचा दुसरा भाग बनवला आणि
त्याच बरोबरीने 'तात्या
विंचू' ला
जिवंत ठेऊन श्रोत्यांची उत्सुकता आणि अपेक्षा अजून
वाढवली आहे. चित्रपट
गृहातून बाहेर येताना प्रत्येक जणांनी 'झपाटलेला
३' ची
वाट बघण्याचे व्यक्त
केले. ज्या
रीतीने 'झापालेला
२' नी
सर्वांना झपाटून टाकले आहे त्याच झपाट्याने महेश आणि आदिनाथ कोठारे च्या प्रत्येक चित्रपटाला अशीच
लोकप्रीयता मिळावी, अधिकाधिक पुरस्कार आणि जनतेच्या प्रेमाचा वर्षाव होवो हीच
सदिच्छा.