Tuesday, March 11, 2014

नाण्याची दुसरी बाजू

                                                                          नाण्याची दुसरी बाजू 


आज ८ मार्च! जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या कर्तुत्वाची आणि योगदानाची दखल पुरुषांनी घेतल्याचा हा नमुना. एक यशस्वी व्यक्तिमत्व जिचं योगदान आज कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने एका पातळीवर आहे अश्या स्त्रीच्या अस्तित्वाचा आज सम्मान केला जातो. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे कि असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकत नाही. एक आजीआई, मुलगी, बहिणप्रेमिका, बायको किव्हा मैत्रीण अश्या विविध भूमिका ती साकारत आली आहे. ह्या सर्व भूमिकांना न्याय देणे तिच्या कढून अपेक्षित असते कारण ती 'स्त्री' म्हणून जन्माला आली आहे. हा तिचा दोष किव्हा तिचे भोग असे समजू शकतो. परंतु ह्या सर्व भूमिकांना योग्य न्याय देण्याची जबाबदारी केवळ स्त्री काढूनच अपेक्षित केली जाते. ह्याचे कारण केवळ स्त्रीलाच ह्या सर्व जबाबदार्या हाताळण्याची क्षमता देवानी दिलेली आहे. 


सहनशीलता, प्रेम, धैर्य, कर्तुत्व, ह्या सर्व गुणांनी परिपूर्ण अशी स्त्री एक पुज्य व्यक्तिमत्व आहे. अमेरिकेत २८ फेबृअरी १९०९ ला  पहिला राज्य महिला दिन साजरा केला गेला परंतु महिला दिन साजरा करण्याचा त्यांचा उद्देश होता महिलांनाच्या अधिकाराच्या आंदोलनाचा गौरव करणे. तेव्हा पासून आज पर्यंत भरपूर बदल घडला आणि आज महिलांना तो दर्जा प्राप्त झालाय आणि महिला त्यांचे अधिकार प्रत्येक क्षेत्रात सिद्ध करीत आहेत. मग ते पुरुषांच्या बरोबरीचा पद असो किव्हा महिलां साठी खास बस आणि ट्रेन मधली आरक्षित जागा. स्त्री आता सक्शम आहे आणि आपला अधिकार मिळवू शक्ते.


स्त्रीयांनी सगळ्या अडथळ्यांना समोर जाऊन ह्या पुरुष प्राधान्य जगात आपला ठसा उमटवला आहे हि अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.  हे महत्कृत्य केल्या बद्दल काही स्त्रियांना त्यांच्या  कामगिरीचा प्रचंड अभिमान असल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या स्वभावात आणि वागणुकीत दिसून येतो. ह्या कामगिरी चा अभिमान न बाळगता नम्र असण्यात मोठेपणा आहे ह्याची जाणीव नस्ते. स्त्री एक सर्वगुण संपन्न मनुष्य आहे आणि तीच ह्या सर्व भूमिका योग्य रित्या पार पाडू शकते. मग ती भूमिका आजीची असो किव्हा आई ची, बहिणीची असो किव्हा मुलीची, प्रेमिकेची असो किव्हा मैत्रिणीची. परंतु ह्या सर्व भूमिका पार पडताना तिने नम्रता  बाळगायला हवी असे माझे वैयक्तिक मत आहे.


 प्रय्तेक स्त्री आपल्या कामात उच्च पदनाम सांभाळून आपल्या घराचीमुलांची आणि नवर्याची काळजी घेत असते. परंतु ह्या सर्व भूमिका पार पडताना आपण किती महान आहोत किव्हा आपण आपल्या परिवार साठी किती मोठे योगदान आणि बलिदान दिले आहे ह्याची सतत जाणीव आणि गर्व न करता आपले कर्त्यव्य समजून करण्यात मोठेपणा आहे असा मला वाटतं. आपण किती कर्तुत्वान आहोत, ह्याची जाणीव क्षणा क्षणाला आपल्या परिवाराला किव्हा मित्र मैत्रिणींना दाखवण्यात, त्या व्यक्तीच्या प्रती आदर नाहीसा होतो. आपल्या क्षमतेचा आणि कामगिरीचा गर्व नसून, नम्रता हाच स्त्रीचा खरा दागिना आहे ह्याची जाणीव प्रत्येक स्त्रीला हवी. 


महिलांच्या सुरक्षते साठी आणि आपला अधिकार मिळवण्या साठी आपल्या सरकारनी कायदेशीर दाखल सुद्धा घेतली. हुंडा साठी मानसिक आणि शारीरिक चलवाद करणार्या विरुद्ध कलम ४९८ अ आणि हिंसाचारा विरुद्ध न्याय मिळवण्या साठी 'Domestic Violence Act' असे नियम सरकारनी बनवले आहेत. स्त्रिया ह्या कायद्याचा फायदा त्यांच्या अधिकारासाठी करून घेत आहेतच परंतु निराशाजनक गोष्ट अशी कि ह्याच कायद्याचा दुरुपयोग सुद्धा ह्याच महिलांच्या हातून होत आहे. नवरा आणि सासरच्या माणसां विरुद्ध ४९८ अ कलमा खाली तक्रार करणे आणि आपल्यावर हिसाचार सिद्ध करणे सोप्पे झाले आहे. मानसिक आणि शारीरिक छळवादा विरुद्ध स्त्रियांना सौरक्षण आहे परंतु पुरुषां साठी असा कायदा अध्याप योजीलेला नाही. महिला आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करताना आपण पाहतो परंतु आता त्यांना कायदेशीर सौरक्षण मिळाल्यावर अश्या महिलांची संक्या वाढत चाललेली आहे जे अश्या कायद्याचा दुरुपयोग करू इच्छितात. पुरुषां विरुद्ध कायद्याचा दुरुपयोग करण्याचे प्रमाण इतके वाढत चालले आहे कि स्त्री बद्दल जी कमकुवत आणि लाचार अशी भावना होती ती आता बदलत चाललेली आहे. तो दिवस दूर नसेल जेव्हा पुरुषांना त्यांच्या सौराक्षाना साठी हीच लढाई लढावी लागेल. 


ही झाली नाण्याची एक बाजू परंतु एवडे कायदे असूनही स्त्री सुरक्षित नाहीच हे आपण रोज वृत्त पत्रात पहतोच. लैंगिक छळवणूक, बलात्कार सारख्या गुन्हयान पासून अस्जूनही स्त्रियांना सौरक्षण नहिच. स्त्रिया कितीही पुरुषांच्या बरोबरीने समाजात वावरल्या तरी लैंगिक छळअवनुकीतून त्यांची सुटका नाही. मग कसला महिला दिन साजरा केला जातो? केवळ आपल्या आई बहिणी आणि बायको पुरता महिला दिन असतो का? काही पुरुष आजच्या दिवसाला मोठ मोठे sms आणि शुभेच्छा व्यक्त करतात कि स्त्री चा आदर करावा, स्त्री ही सहनशीलता, प्रेम आणि शक्तीचा प्रतिक आहे इत्यादी. परंतु तो आदर केवळ आपल्या घरातल्या स्त्रियां पुरता असतो असं म्हणणं खोटं ठरणार नाही. कारण इतर स्त्रियांकडे त्या आदराने पाहिले जात नाही हे आपल्याला अनेक सामाजिक घटनेतून आढळून येतंच.  


स्त्रीयांच्या अधिकारचा गौरव करण्यासाठी जरी हा दिवस साजरा केला जात असला तरी स्त्री चा सम्मान आणि आदर करणे हे सुधा ह्या सोहोळ्याचा अविभाज्य भाग आहे. परंतु ह्याला केवळ एका ढोंगाचे स्वरूप येतं कारण जे पुरुष आज स्त्री गौरवाचे चार शब्द प्रसारित करीत आहेत तेच पुरुष उद्या स्त्रियांच्या विवस्त्र चित्रांचा प्रसार आपल्या मित्रांमध्ये करायला  सज्ज असतील. म्हणजेच जरी स्त्रियांना त्यांचा अधिकार दिला गेला तरी समाजात तिला एक संभोगाचे  चिन्ना म्हणूनच पाहिले जाते. मोठ्या पदावर असलेली स्त्री असो किव्हा एक कामगार स्त्री, दोघीं मध्ये साम्य एकच कि ती एक स्त्री आहे आणि तिच्याकडे पाहण्याची दृष्टी केवळ लैंगिक प्रतिक म्हणून असते  हि निराशाजनक बाब आहे. 


हा एक वादाचा विषय आहे खरा. बर्याच जनांना हे विचार पटले नसतील किव्हा पटले हि असतील परंतु आपण किती चुकतो आणि मुख्यतः आपले दोष स्वीकारण्याचा मोठेपणा कुठेही आढळून येत नाही. प्रत्येक नाण्याla जश्या दोन बाजू असतात आणि दोन्ही बाजूंना तेव्डेच महत्व आणि सत्यता असते तसेच आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आपल्या हातात असतं कोणती बाजू बळकट करावी आणि कोणते दुर्गुण आपल्या आयुष्यातून काढून टाकावे. 


मी एक महिला असल्याने  मी केवळ महिलांनाच  प्राधान्य देणारी नाही परंतु त्यांचे गुण दोष जाणून ह्या नाण्याची दुसरी बाजू सुद्धा काबुल करते. त्याच बरोबरीने पुरुषांचे दोष सुद्धा नाझरेआड न करता ह्या  जागतिक महिला दिनाच्या सोहळ्य बद्दलच्या फसवणुकीचा निषेद व्यक्त करते. आपली नाती, आपला परिवार आणि समाजाच्या   प्रती आपले कर्तव्य आणि जबाबदारी पूर्णपणे निभावणार्या प्रत्येक नम्र आणि प्रामाणिक स्त्रीला ह्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.