Saturday, July 5, 2014

का रे अबोला !

                                                                           का रे अबोला !

                                               

"वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा". हे शब्द टाईप करताना क्षणभर थांबले. मी हे काय करीत आहे हा विचार करण्या येवडा तरी वेळ मला मिळाला. मिळाला म्हणण्या पेक्षा, वेळ मी काढला. काही वर्षांपूर्वी कोणत्याही नातेवाईक किव्हा मित्रांच्या वाढदिवसाला माझा न चुकता सकाळी फोन असायचा. वर्षभर जरी मी त्यांच्याशी बोलले नाही तरी वाढदिवस मात्र चुकायचा नाही. स्वतःला जणू काही मी तशी शिस्त लावलेली. आपल्या वाढदिवसाला कोणी न चुकता आपली आठवण काढत आहे ह्या गोष्टीचा आनंद त्या व्यक्तीच्या आवाजातून भासायचा. मला स्वतःला समाधान की आपण कोणालातरी केवळ त्याची आठवण काढून आनंद देऊ शकतो. वर्षातून एक वैयत्तिक संभाषण, ते नातं जोपासण्यासाठी परिपूर्ण होतं. 


काळ सरत गेला. तंत्राग्यानानी मनुष्याला आपले गुलाम केले आणि माणुसकी आणि भावनानचा वध करीत गेला. दूरध्वनी मुळे जसा दुरावा मिटल्या सारखा वाटला तोच 'mobile' फोन मुळे वाढत गेला. सुरुवात झाली ती sms नी आणि आता 'chat' वर येउन पोहोचलाय. साध्या साध्या गोष्टींसाठी 'mobile chat' चा वापर अपरिहार्य झाला आहे. पूर्वी आपल्या मित्र मंडळी आणि नातेवाईकांचे जन्मदिवस बर्याच जणांना पाठ असायचे, त्या नंतर कॅलेंडर वर लिहून ठेवायची सवय होती. कॅलेंडर पाहूनच फोन केला जायचा असे नाही परंतु वर्ष अखेरी नूतन वर्षाचे कॅलेंडर येताच, सर्वांचे जन्मदिवस आणि लग्नाचे वाढदिवस ह्या दोन्ही गोष्टी त्या कॅलेंडर वर लिहिण्याचा कार्यक्रम बर्याच जणांचा असायचा. 


संबंध वाढत गेले आणि यादी मोठी होत गेली. सोयीस्कर 'sms' ची सवय अंगवळणी पडत गेली. कामातून वेळ काढणे कठीण होत गेले आणि त्या नात्यांना दुरावण्याची पहिली पायरी ह्या 'mobile' नी गाठली. कामातून वेळ काढून शुभेछा व्यक्त करणे 'sms' मुळे सोप्पे होत गेले. मध्यंतरी 'E-cards' बर्यापैकी लोकप्रिय झालेले कारण त्यामुळे दुकानात जाऊन 'cards' घेण्यसाठी लागणारा वेळ वाचत होता. परंतु आता त्या 'E-cards' चे महत्व सुद्धा कमी होत चालले आहे कारण 'Whatsapp' आणि 'Facebook' सारखे 'Social networking' मध्यम त्याहुनी सोयीस्कर होत चालले आहेत. ' Whatsapp' आणि  'Facebook' वर  'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा' हे मोजून ३ शब्द लिहिले कि आपण आपले कर्तव्य पार पाडले अशी भावना सर्वसामान्य रित्या आढळायला लागली. 


ह्या सर्व गोष्टी तंत्रज्ञानामुळे सोयीस्कर होत गेल्यामुळे काही दूर असलेल्यांशी संबंध वाढत गेला आणि जवळ असणार्यांशी दुरावा. आपण हे विसरत चाललो आहोत कि आपल्याला एकमेकांना भेटण्यात किव्हा फोनवर बोलण्याचे बंधन नाही. तरी सुद्धा 'sms' किंव्हा 'chat' चा वापर केला जातो. साधे आमंत्रण द्यायचे झाले कि सुद्धा उचलला फोन आणि 'whatsapp' वर टाकला 'message'. एखाद्या 'group' वर आमंत्रण टाकले कि कोणी वाचले न वाचले, आपण आमंत्रण दिले आहे हे सिद्ध करायला मोकळे. 


हे 'chat' प्रकरण येवडे लोकप्रिय झाले आहे कि प्रत्यक्षात समोरासमोर यायचे वेळ आली कि तोंडून शब्द फुटत नाहित. 'Chat' शिवाय बर्याच जणांना भेटल्यावर काय बोलायचे  सुचत नाही. परंतु 'chat' वर मात्र तासंतास गप्पा हाणू शकतात. ह्याचे कारण वाय्यातिक पातळीवर कोणाशी प्रत्यक्षात बोलायला कोणाला वेळ काढायची इच्छा नाही आणि आता तर सवयच नाही राहिली.  केवळ 'chat friends' अशी कृत्रिम नाती हल्ली  पहायला मिळतात. आज जर 'mobile' फोन नसतेच तर आपण प्रत्यक्षात भेटून किंव्हा न जमल्यास प्रत्यक्षात 'call' करून बोललोच असतो, नाही का? परंतु 'mobile' सारख्या उत्तम तंत्राग्यानाचा दुरुपयोग होताना पाहून वाईट वाटतं.


ह्या 'chat' पद्धती मुळे एकमेका मध्ये संभाषण कमी होत चालले आहे. दुराव्या बरोबर संशय आणि चुकीचे समज वाढत चालले आहेत. ह्या सगळ्यामुळे नाती दुरावली जात आहेत. ह्या सगळ्याची जबाबदारी आपलीच आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर न केल्याचा हा परिणाम. ह्या उत्तम शोधाचा योग्य वापर केला असता तर दुरावलेली नाती पुन्हा एक होऊ शकली असती. एकमेकांचे संबंध अजूनही बळकट झाले अस्ते. परंतु हल्ली एका घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचा वायातिक 'mobile' फोन असल्या करणामुळे परिवार विभागला गेलेला आढळून येतो. परिवाराचा प्रत्येक सदस्या घरात असून सुद्धा प्रत्येकाच्या हातात 'mobile' दिसून येतो. 'Mobile' हातात असणे वाईट नाही परंतु निराशाजनक आणि धक्कादायक गोष्ट अशी की हे सदस्य एक मेकांच्या जवळ असून सुद्धा प्रत्येक जण तिसर्याच व्यक्तीशी mobile वर chat करताना आढळून येतो. 


त्यामुळे 'कुटुंब' आणि त्यातल्या सदस्यांची नाती डगमगत चालली आहेत. काळजी वाटते ती पुढच्या पिढीची जी ह्या संस्कृती ला सामान्य समजत आहे. शाळा महाविद्यालयातली मुलं ह्याच संस्कृतीला आपले समजायला लागले आहेत. अतिशय वाईट वाटतं ह्या मुलांना पाहून जेव्हा मुलं लपण डाव, लगोरी, कॅरोम, पत्ते ह्या सारखे खेळ सोडून एक मेकांच्या mobile मध्ये डोकावून नवीन mobile games आणि applications शिकत आहेत. मला माझ्या लहान पणीचे दिवस आठवले कि आपल्या बहिणी आणि भावंडान बरोबर घालवलेले, मोठ मोठ्याने हसत खिदळत खेळ खेळतानाचे दृश्य डोळ्या समोर येते. जेव्हा हल्लीची पिढी त्या mobile मध्ये डोकावताना पाहते तेव्हा वाईट वाटतं कि ह्या मुलांनी लहानपण उपभोग्लाच नाही. 


मी असे म्हणत नाही कि ह्या 'mobile' च्या व्यसनापासून मी मुक्त आहे. 'Mobile' चे व्यसन मला हि आहे आणि ह्या व्यसना पासून माझ्या सकट आपल्या सर्वांची सुटका व्हावी हीच इच्छा आहे कारण व्यसन कोणतेही असो त्यामुळे नाती दुरावली जातात हे खरे आहे. आपणच नकळत साठून ठेवलेल्या अबोल्यामुळे नात्यान मधला दुरावा वाढत चालला आहे ही काळजी करण्या सारखी गोष्ट आहे. ह्या क्षणाला कदाचित आपल्याला ह्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात येणार नाही परंतु जेव्हा आपल्याला दिसून येईल कि आपल्या पुढची पिढी नाती सोडून अप्पलपोटी झाली आहेत तेव्हा ह्या स्थितीला कारणीभूत स्वतःला समजावे. वेळ अजून सरली नाही. नात्यान मध्ये तेवडी टाकत असतेच कि ते शेवटच्या टोकावरून सुद्धा पुन्हा मागे फिरू शकतात. तेवडी धृडता आणि चिकाटी असेल तर नाती सांभाळणे कठीण नाही. 


'Mobile' फोन मुळे एकमेकान मध्ये झालेला दुरावा केवळ 'communication' नी मिटू शक्तो. त्या साठी गरज आहे असलेला वेळ आपल्या परिवारा सोबत संभाषण करून घालवण्याची. 'कुटुंब' हा शब्द सार्थ करण्यासाठी कुटुंबाचे सदस्य असण्याचे कर्तव्य पूर्ण करणे, हे अत्यंत गरजेचे आणि महत्वाचे आहे. त्या करिता आपण स्वतः आणि आपली पुढची पिढी ह्या 'mobile' च्या दुनियेतून लवकरात लवकर बाहेर निघावी अशी अशा करते. ह्याचे कारण एकाच. आपल्या मुलांना नात्याचे महत्व समजावे आणि मुख्यतः त्या नात्यांना जपून त्यांचा आदर करावा. ' Effective Communication' चे महत्व आपल्या मुलांनी जाणावे हि अत्यंत गरजेची गोष्ट आहे. 


आपण कितीही नाही म्हटले आणि स्वतःला निर्दोष नाही मानले तरी हि वस्तुस्थिती आहे कि आपल्या नात्यांमध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे जी आपण नझरेआड करीत आहोत. आता वेळ आहे हा प्रश्न स्वतःला करण्याचा की, " हा अबोला का? आणि का हा दुरावा?" हे प्रश्न आता विचारले गेले नाहीत तर ह्याच्या पुढ्या प्रश्नाचे उत्तर मागण्याचा अधिकार आपण गमावून बसु. आज जर आपण ह्या निराशाजनक वस्तुस्थितीला नझरेआड केले, तर तो दिवस दूर नसेल जेव्हा आपल्याकडेच उत्तर नसेल कि हा दुरावा कसा मिटेल. तेव्हा मनात तो प्रश्न घर करेल की, "अपराध माझा असा काय झाला?"  परंतु त्याचे उत्तर कदाचित 'chat' द्वारे सुद्धा मिळायचे नाही आणि पुन्हा एकदा मनात तोच प्रश्न येत राहील, "का रे अबोला???" 





No comments:

Post a Comment