Saturday, July 5, 2014

का रे अबोला !

                                                                           का रे अबोला !

                                               

"वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा". हे शब्द टाईप करताना क्षणभर थांबले. मी हे काय करीत आहे हा विचार करण्या येवडा तरी वेळ मला मिळाला. मिळाला म्हणण्या पेक्षा, वेळ मी काढला. काही वर्षांपूर्वी कोणत्याही नातेवाईक किव्हा मित्रांच्या वाढदिवसाला माझा न चुकता सकाळी फोन असायचा. वर्षभर जरी मी त्यांच्याशी बोलले नाही तरी वाढदिवस मात्र चुकायचा नाही. स्वतःला जणू काही मी तशी शिस्त लावलेली. आपल्या वाढदिवसाला कोणी न चुकता आपली आठवण काढत आहे ह्या गोष्टीचा आनंद त्या व्यक्तीच्या आवाजातून भासायचा. मला स्वतःला समाधान की आपण कोणालातरी केवळ त्याची आठवण काढून आनंद देऊ शकतो. वर्षातून एक वैयत्तिक संभाषण, ते नातं जोपासण्यासाठी परिपूर्ण होतं. 


काळ सरत गेला. तंत्राग्यानानी मनुष्याला आपले गुलाम केले आणि माणुसकी आणि भावनानचा वध करीत गेला. दूरध्वनी मुळे जसा दुरावा मिटल्या सारखा वाटला तोच 'mobile' फोन मुळे वाढत गेला. सुरुवात झाली ती sms नी आणि आता 'chat' वर येउन पोहोचलाय. साध्या साध्या गोष्टींसाठी 'mobile chat' चा वापर अपरिहार्य झाला आहे. पूर्वी आपल्या मित्र मंडळी आणि नातेवाईकांचे जन्मदिवस बर्याच जणांना पाठ असायचे, त्या नंतर कॅलेंडर वर लिहून ठेवायची सवय होती. कॅलेंडर पाहूनच फोन केला जायचा असे नाही परंतु वर्ष अखेरी नूतन वर्षाचे कॅलेंडर येताच, सर्वांचे जन्मदिवस आणि लग्नाचे वाढदिवस ह्या दोन्ही गोष्टी त्या कॅलेंडर वर लिहिण्याचा कार्यक्रम बर्याच जणांचा असायचा. 


संबंध वाढत गेले आणि यादी मोठी होत गेली. सोयीस्कर 'sms' ची सवय अंगवळणी पडत गेली. कामातून वेळ काढणे कठीण होत गेले आणि त्या नात्यांना दुरावण्याची पहिली पायरी ह्या 'mobile' नी गाठली. कामातून वेळ काढून शुभेछा व्यक्त करणे 'sms' मुळे सोप्पे होत गेले. मध्यंतरी 'E-cards' बर्यापैकी लोकप्रिय झालेले कारण त्यामुळे दुकानात जाऊन 'cards' घेण्यसाठी लागणारा वेळ वाचत होता. परंतु आता त्या 'E-cards' चे महत्व सुद्धा कमी होत चालले आहे कारण 'Whatsapp' आणि 'Facebook' सारखे 'Social networking' मध्यम त्याहुनी सोयीस्कर होत चालले आहेत. ' Whatsapp' आणि  'Facebook' वर  'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा' हे मोजून ३ शब्द लिहिले कि आपण आपले कर्तव्य पार पाडले अशी भावना सर्वसामान्य रित्या आढळायला लागली. 


ह्या सर्व गोष्टी तंत्रज्ञानामुळे सोयीस्कर होत गेल्यामुळे काही दूर असलेल्यांशी संबंध वाढत गेला आणि जवळ असणार्यांशी दुरावा. आपण हे विसरत चाललो आहोत कि आपल्याला एकमेकांना भेटण्यात किव्हा फोनवर बोलण्याचे बंधन नाही. तरी सुद्धा 'sms' किंव्हा 'chat' चा वापर केला जातो. साधे आमंत्रण द्यायचे झाले कि सुद्धा उचलला फोन आणि 'whatsapp' वर टाकला 'message'. एखाद्या 'group' वर आमंत्रण टाकले कि कोणी वाचले न वाचले, आपण आमंत्रण दिले आहे हे सिद्ध करायला मोकळे. 


हे 'chat' प्रकरण येवडे लोकप्रिय झाले आहे कि प्रत्यक्षात समोरासमोर यायचे वेळ आली कि तोंडून शब्द फुटत नाहित. 'Chat' शिवाय बर्याच जणांना भेटल्यावर काय बोलायचे  सुचत नाही. परंतु 'chat' वर मात्र तासंतास गप्पा हाणू शकतात. ह्याचे कारण वाय्यातिक पातळीवर कोणाशी प्रत्यक्षात बोलायला कोणाला वेळ काढायची इच्छा नाही आणि आता तर सवयच नाही राहिली.  केवळ 'chat friends' अशी कृत्रिम नाती हल्ली  पहायला मिळतात. आज जर 'mobile' फोन नसतेच तर आपण प्रत्यक्षात भेटून किंव्हा न जमल्यास प्रत्यक्षात 'call' करून बोललोच असतो, नाही का? परंतु 'mobile' सारख्या उत्तम तंत्राग्यानाचा दुरुपयोग होताना पाहून वाईट वाटतं.


ह्या 'chat' पद्धती मुळे एकमेका मध्ये संभाषण कमी होत चालले आहे. दुराव्या बरोबर संशय आणि चुकीचे समज वाढत चालले आहेत. ह्या सगळ्यामुळे नाती दुरावली जात आहेत. ह्या सगळ्याची जबाबदारी आपलीच आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर न केल्याचा हा परिणाम. ह्या उत्तम शोधाचा योग्य वापर केला असता तर दुरावलेली नाती पुन्हा एक होऊ शकली असती. एकमेकांचे संबंध अजूनही बळकट झाले अस्ते. परंतु हल्ली एका घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचा वायातिक 'mobile' फोन असल्या करणामुळे परिवार विभागला गेलेला आढळून येतो. परिवाराचा प्रत्येक सदस्या घरात असून सुद्धा प्रत्येकाच्या हातात 'mobile' दिसून येतो. 'Mobile' हातात असणे वाईट नाही परंतु निराशाजनक आणि धक्कादायक गोष्ट अशी की हे सदस्य एक मेकांच्या जवळ असून सुद्धा प्रत्येक जण तिसर्याच व्यक्तीशी mobile वर chat करताना आढळून येतो. 


त्यामुळे 'कुटुंब' आणि त्यातल्या सदस्यांची नाती डगमगत चालली आहेत. काळजी वाटते ती पुढच्या पिढीची जी ह्या संस्कृती ला सामान्य समजत आहे. शाळा महाविद्यालयातली मुलं ह्याच संस्कृतीला आपले समजायला लागले आहेत. अतिशय वाईट वाटतं ह्या मुलांना पाहून जेव्हा मुलं लपण डाव, लगोरी, कॅरोम, पत्ते ह्या सारखे खेळ सोडून एक मेकांच्या mobile मध्ये डोकावून नवीन mobile games आणि applications शिकत आहेत. मला माझ्या लहान पणीचे दिवस आठवले कि आपल्या बहिणी आणि भावंडान बरोबर घालवलेले, मोठ मोठ्याने हसत खिदळत खेळ खेळतानाचे दृश्य डोळ्या समोर येते. जेव्हा हल्लीची पिढी त्या mobile मध्ये डोकावताना पाहते तेव्हा वाईट वाटतं कि ह्या मुलांनी लहानपण उपभोग्लाच नाही. 


मी असे म्हणत नाही कि ह्या 'mobile' च्या व्यसनापासून मी मुक्त आहे. 'Mobile' चे व्यसन मला हि आहे आणि ह्या व्यसना पासून माझ्या सकट आपल्या सर्वांची सुटका व्हावी हीच इच्छा आहे कारण व्यसन कोणतेही असो त्यामुळे नाती दुरावली जातात हे खरे आहे. आपणच नकळत साठून ठेवलेल्या अबोल्यामुळे नात्यान मधला दुरावा वाढत चालला आहे ही काळजी करण्या सारखी गोष्ट आहे. ह्या क्षणाला कदाचित आपल्याला ह्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात येणार नाही परंतु जेव्हा आपल्याला दिसून येईल कि आपल्या पुढची पिढी नाती सोडून अप्पलपोटी झाली आहेत तेव्हा ह्या स्थितीला कारणीभूत स्वतःला समजावे. वेळ अजून सरली नाही. नात्यान मध्ये तेवडी टाकत असतेच कि ते शेवटच्या टोकावरून सुद्धा पुन्हा मागे फिरू शकतात. तेवडी धृडता आणि चिकाटी असेल तर नाती सांभाळणे कठीण नाही. 


'Mobile' फोन मुळे एकमेकान मध्ये झालेला दुरावा केवळ 'communication' नी मिटू शक्तो. त्या साठी गरज आहे असलेला वेळ आपल्या परिवारा सोबत संभाषण करून घालवण्याची. 'कुटुंब' हा शब्द सार्थ करण्यासाठी कुटुंबाचे सदस्य असण्याचे कर्तव्य पूर्ण करणे, हे अत्यंत गरजेचे आणि महत्वाचे आहे. त्या करिता आपण स्वतः आणि आपली पुढची पिढी ह्या 'mobile' च्या दुनियेतून लवकरात लवकर बाहेर निघावी अशी अशा करते. ह्याचे कारण एकाच. आपल्या मुलांना नात्याचे महत्व समजावे आणि मुख्यतः त्या नात्यांना जपून त्यांचा आदर करावा. ' Effective Communication' चे महत्व आपल्या मुलांनी जाणावे हि अत्यंत गरजेची गोष्ट आहे. 


आपण कितीही नाही म्हटले आणि स्वतःला निर्दोष नाही मानले तरी हि वस्तुस्थिती आहे कि आपल्या नात्यांमध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे जी आपण नझरेआड करीत आहोत. आता वेळ आहे हा प्रश्न स्वतःला करण्याचा की, " हा अबोला का? आणि का हा दुरावा?" हे प्रश्न आता विचारले गेले नाहीत तर ह्याच्या पुढ्या प्रश्नाचे उत्तर मागण्याचा अधिकार आपण गमावून बसु. आज जर आपण ह्या निराशाजनक वस्तुस्थितीला नझरेआड केले, तर तो दिवस दूर नसेल जेव्हा आपल्याकडेच उत्तर नसेल कि हा दुरावा कसा मिटेल. तेव्हा मनात तो प्रश्न घर करेल की, "अपराध माझा असा काय झाला?"  परंतु त्याचे उत्तर कदाचित 'chat' द्वारे सुद्धा मिळायचे नाही आणि पुन्हा एकदा मनात तोच प्रश्न येत राहील, "का रे अबोला???" 





Tuesday, March 11, 2014

नाण्याची दुसरी बाजू

                                                                          नाण्याची दुसरी बाजू 


आज ८ मार्च! जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या कर्तुत्वाची आणि योगदानाची दखल पुरुषांनी घेतल्याचा हा नमुना. एक यशस्वी व्यक्तिमत्व जिचं योगदान आज कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने एका पातळीवर आहे अश्या स्त्रीच्या अस्तित्वाचा आज सम्मान केला जातो. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे कि असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकत नाही. एक आजीआई, मुलगी, बहिणप्रेमिका, बायको किव्हा मैत्रीण अश्या विविध भूमिका ती साकारत आली आहे. ह्या सर्व भूमिकांना न्याय देणे तिच्या कढून अपेक्षित असते कारण ती 'स्त्री' म्हणून जन्माला आली आहे. हा तिचा दोष किव्हा तिचे भोग असे समजू शकतो. परंतु ह्या सर्व भूमिकांना योग्य न्याय देण्याची जबाबदारी केवळ स्त्री काढूनच अपेक्षित केली जाते. ह्याचे कारण केवळ स्त्रीलाच ह्या सर्व जबाबदार्या हाताळण्याची क्षमता देवानी दिलेली आहे. 


सहनशीलता, प्रेम, धैर्य, कर्तुत्व, ह्या सर्व गुणांनी परिपूर्ण अशी स्त्री एक पुज्य व्यक्तिमत्व आहे. अमेरिकेत २८ फेबृअरी १९०९ ला  पहिला राज्य महिला दिन साजरा केला गेला परंतु महिला दिन साजरा करण्याचा त्यांचा उद्देश होता महिलांनाच्या अधिकाराच्या आंदोलनाचा गौरव करणे. तेव्हा पासून आज पर्यंत भरपूर बदल घडला आणि आज महिलांना तो दर्जा प्राप्त झालाय आणि महिला त्यांचे अधिकार प्रत्येक क्षेत्रात सिद्ध करीत आहेत. मग ते पुरुषांच्या बरोबरीचा पद असो किव्हा महिलां साठी खास बस आणि ट्रेन मधली आरक्षित जागा. स्त्री आता सक्शम आहे आणि आपला अधिकार मिळवू शक्ते.


स्त्रीयांनी सगळ्या अडथळ्यांना समोर जाऊन ह्या पुरुष प्राधान्य जगात आपला ठसा उमटवला आहे हि अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.  हे महत्कृत्य केल्या बद्दल काही स्त्रियांना त्यांच्या  कामगिरीचा प्रचंड अभिमान असल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या स्वभावात आणि वागणुकीत दिसून येतो. ह्या कामगिरी चा अभिमान न बाळगता नम्र असण्यात मोठेपणा आहे ह्याची जाणीव नस्ते. स्त्री एक सर्वगुण संपन्न मनुष्य आहे आणि तीच ह्या सर्व भूमिका योग्य रित्या पार पाडू शकते. मग ती भूमिका आजीची असो किव्हा आई ची, बहिणीची असो किव्हा मुलीची, प्रेमिकेची असो किव्हा मैत्रिणीची. परंतु ह्या सर्व भूमिका पार पडताना तिने नम्रता  बाळगायला हवी असे माझे वैयक्तिक मत आहे.


 प्रय्तेक स्त्री आपल्या कामात उच्च पदनाम सांभाळून आपल्या घराचीमुलांची आणि नवर्याची काळजी घेत असते. परंतु ह्या सर्व भूमिका पार पडताना आपण किती महान आहोत किव्हा आपण आपल्या परिवार साठी किती मोठे योगदान आणि बलिदान दिले आहे ह्याची सतत जाणीव आणि गर्व न करता आपले कर्त्यव्य समजून करण्यात मोठेपणा आहे असा मला वाटतं. आपण किती कर्तुत्वान आहोत, ह्याची जाणीव क्षणा क्षणाला आपल्या परिवाराला किव्हा मित्र मैत्रिणींना दाखवण्यात, त्या व्यक्तीच्या प्रती आदर नाहीसा होतो. आपल्या क्षमतेचा आणि कामगिरीचा गर्व नसून, नम्रता हाच स्त्रीचा खरा दागिना आहे ह्याची जाणीव प्रत्येक स्त्रीला हवी. 


महिलांच्या सुरक्षते साठी आणि आपला अधिकार मिळवण्या साठी आपल्या सरकारनी कायदेशीर दाखल सुद्धा घेतली. हुंडा साठी मानसिक आणि शारीरिक चलवाद करणार्या विरुद्ध कलम ४९८ अ आणि हिंसाचारा विरुद्ध न्याय मिळवण्या साठी 'Domestic Violence Act' असे नियम सरकारनी बनवले आहेत. स्त्रिया ह्या कायद्याचा फायदा त्यांच्या अधिकारासाठी करून घेत आहेतच परंतु निराशाजनक गोष्ट अशी कि ह्याच कायद्याचा दुरुपयोग सुद्धा ह्याच महिलांच्या हातून होत आहे. नवरा आणि सासरच्या माणसां विरुद्ध ४९८ अ कलमा खाली तक्रार करणे आणि आपल्यावर हिसाचार सिद्ध करणे सोप्पे झाले आहे. मानसिक आणि शारीरिक छळवादा विरुद्ध स्त्रियांना सौरक्षण आहे परंतु पुरुषां साठी असा कायदा अध्याप योजीलेला नाही. महिला आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करताना आपण पाहतो परंतु आता त्यांना कायदेशीर सौरक्षण मिळाल्यावर अश्या महिलांची संक्या वाढत चाललेली आहे जे अश्या कायद्याचा दुरुपयोग करू इच्छितात. पुरुषां विरुद्ध कायद्याचा दुरुपयोग करण्याचे प्रमाण इतके वाढत चालले आहे कि स्त्री बद्दल जी कमकुवत आणि लाचार अशी भावना होती ती आता बदलत चाललेली आहे. तो दिवस दूर नसेल जेव्हा पुरुषांना त्यांच्या सौराक्षाना साठी हीच लढाई लढावी लागेल. 


ही झाली नाण्याची एक बाजू परंतु एवडे कायदे असूनही स्त्री सुरक्षित नाहीच हे आपण रोज वृत्त पत्रात पहतोच. लैंगिक छळवणूक, बलात्कार सारख्या गुन्हयान पासून अस्जूनही स्त्रियांना सौरक्षण नहिच. स्त्रिया कितीही पुरुषांच्या बरोबरीने समाजात वावरल्या तरी लैंगिक छळअवनुकीतून त्यांची सुटका नाही. मग कसला महिला दिन साजरा केला जातो? केवळ आपल्या आई बहिणी आणि बायको पुरता महिला दिन असतो का? काही पुरुष आजच्या दिवसाला मोठ मोठे sms आणि शुभेच्छा व्यक्त करतात कि स्त्री चा आदर करावा, स्त्री ही सहनशीलता, प्रेम आणि शक्तीचा प्रतिक आहे इत्यादी. परंतु तो आदर केवळ आपल्या घरातल्या स्त्रियां पुरता असतो असं म्हणणं खोटं ठरणार नाही. कारण इतर स्त्रियांकडे त्या आदराने पाहिले जात नाही हे आपल्याला अनेक सामाजिक घटनेतून आढळून येतंच.  


स्त्रीयांच्या अधिकारचा गौरव करण्यासाठी जरी हा दिवस साजरा केला जात असला तरी स्त्री चा सम्मान आणि आदर करणे हे सुधा ह्या सोहोळ्याचा अविभाज्य भाग आहे. परंतु ह्याला केवळ एका ढोंगाचे स्वरूप येतं कारण जे पुरुष आज स्त्री गौरवाचे चार शब्द प्रसारित करीत आहेत तेच पुरुष उद्या स्त्रियांच्या विवस्त्र चित्रांचा प्रसार आपल्या मित्रांमध्ये करायला  सज्ज असतील. म्हणजेच जरी स्त्रियांना त्यांचा अधिकार दिला गेला तरी समाजात तिला एक संभोगाचे  चिन्ना म्हणूनच पाहिले जाते. मोठ्या पदावर असलेली स्त्री असो किव्हा एक कामगार स्त्री, दोघीं मध्ये साम्य एकच कि ती एक स्त्री आहे आणि तिच्याकडे पाहण्याची दृष्टी केवळ लैंगिक प्रतिक म्हणून असते  हि निराशाजनक बाब आहे. 


हा एक वादाचा विषय आहे खरा. बर्याच जनांना हे विचार पटले नसतील किव्हा पटले हि असतील परंतु आपण किती चुकतो आणि मुख्यतः आपले दोष स्वीकारण्याचा मोठेपणा कुठेही आढळून येत नाही. प्रत्येक नाण्याla जश्या दोन बाजू असतात आणि दोन्ही बाजूंना तेव्डेच महत्व आणि सत्यता असते तसेच आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आपल्या हातात असतं कोणती बाजू बळकट करावी आणि कोणते दुर्गुण आपल्या आयुष्यातून काढून टाकावे. 


मी एक महिला असल्याने  मी केवळ महिलांनाच  प्राधान्य देणारी नाही परंतु त्यांचे गुण दोष जाणून ह्या नाण्याची दुसरी बाजू सुद्धा काबुल करते. त्याच बरोबरीने पुरुषांचे दोष सुद्धा नाझरेआड न करता ह्या  जागतिक महिला दिनाच्या सोहळ्य बद्दलच्या फसवणुकीचा निषेद व्यक्त करते. आपली नाती, आपला परिवार आणि समाजाच्या   प्रती आपले कर्तव्य आणि जबाबदारी पूर्णपणे निभावणार्या प्रत्येक नम्र आणि प्रामाणिक स्त्रीला ह्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 

Tuesday, July 16, 2013

झपाटले रे …

 

                                                                                                                     

कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित होत असला की एक महिन्या आधी पासूनच आमच्या घरी त्याची चर्चा सुरु होते. चित्रपटाच्या गोष्टी म्हटल्या की माझे कान नकळतच बंद होतात आणि ते शब्द बंद कानावर जणू आदळत असतात. तरी एखादा चित्रपट चांगला असेल असा वाटले तर मी स्वतः तो पाहण्यासाठी आतुर असते. कधी आपल्याला एखाद्या नायक किव्हा नायिके साठी तो चित्रपट पहावासा वाटतो तर कधी एखाद्या दिग्दर्शका साठी तर कधी एखाद्या मोठय निर्मिती गृहाच्या नवामुळे आणि जेव्हा ह्या सगळ्याच गोष्टी एकत्र येतात तेव्हा उत्साह द्विगुणीत होतो. 

 

 'तात्या विंचू' परत येतोय! ही घोषणा गेले काही वर्ष ऐकल्या पासूनच मराठी चित्रपट पाहणाऱ्या शोत्यांच्या मनात एक उत्सुकता आणि खळबळ चालू झालेली. काही चित्रपट असतात ज्यातली पात्र लोकप्रिय होतात आणि त्या पात्रांची नावे अजरामर होतात. गब्बर सिंग म्हणा किंव्हा विजय दिनानाथ चौहान, मोगाम्बो असो किव्हा शाकाल, लहानान पासून मोठ्यान पर्यंत प्रत्येकाला ह्या पात्रांची ओळख आहे. तसेच आपले 'तात्या विंचू' आणि 'कुबड्या खवीस'. जर 'गब्बर सिंग' चा खौफ हिंदी सिने सृष्टीत आहे तर मराठी सिने सृष्टीत 'तात्या विंचू' चा  राज आहे. अशी पात्र निर्माण करून लोकां पर्यंत पोहोचवणं सोप्पी गोष्ट नाही आणि जरी ती लोकां पर्यंत पोहोचवली तरी त्या पात्रांना एक जिवंत रूप देऊन श्रोत्याच्या आयुष्याचा भाग बनवणं अजूनही कठीण. पात्रांना जिवंत स्वरूप आणून आपल्या आयुष्याचा भाग बनवणे दिग्दर्शकाचे काम आहे आणि ते यशस्वी पणे साधलाय आपल्याच महेश कोठारे यांनी. 

 

सतत काहीतरी नवीन करण्याचे धाडस महेश कोठारे करत असतात आणि त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून एक तांत्रिक प्रगती दिसून येते. मारठी सिने सृष्टीला महेश कोठारे यांचे बरेच मोठे योगदान आहे आणि १९८५ पासून त्यांनी जी चळवळ चालू केली आहे, त्या चळवळीने संपूर्ण महाराष्ट्र आता झपाटून गेला आहे. अतिशय अभिमान वाटतो हे घोषित करताना की मराठी सिने सृष्टीला पहिला ३ डी चित्रपट देणारे आपले महेश कोठारे आहेत. 'झपाटलेला २' हा उत्तम दर्ज्याचा उत्कृष्ट सिनेमा असून केवळ दोन आठवड्यात ५ करोड च्या वर धंदा केले आहे. महेश कोठारे यांच्या नवा खाली अजून एक विक्रम नोंदण्यात गेलाय आणि तो म्हणजे 'झपाटलेला २' हा चित्रपट तिसर्या आठवड्यात सुद्धा २४० 'स्क्रीन्स वर प्रदर्शित केला गेला.

 

धूम धडाका पासूनचे त्यांचे सर्व चित्रपट यशस्वी झालेच होते. दे दाणादाण, थरथराटधडाकेबाज, झपाटलेला, खतरनाकपछाडलेला, खबरदार सारखे असे अनेक चित्रपट आपल्याला देऊन महेश कोठारे यांनी आपला एक वेगळाच ठसा उमटवला आहे. एक आघाडीचा चळवळीचा दिग्दर्शक म्हणून त्यांचे नाव मराठी सिने सृस्तीतच न्हावे तर हिंदी सिने सृष्टीतही आदराने घेतले जाते. महेश कोठारे यांनी मराठी सिने सृष्टीला पहिला सिनेमास्कोप चित्रपट 'धडाकेबाजह्याची निर्मिती आणि दिग्दर्शन करून दिला.'चिमणी पाखरे' चित्रपटातून त्यांनी प्रथमच मराठी सिनेमात डॉल्बी डिजिटल ध्वनी मुद्रण आणले. संगणकाचा उपयोग करून एका वेगळ्या पद्धतीने चीत्रीकरण करून महेश कोठारे यांनी 'पछाडलेला' ह्या चित्रपटाला एक उच्च तांत्रिक दर्जा दिला जो मराठी सिने सृष्टीत पहिल्यांदाच पाहिला गेला आणि आता ' झपाटलेला २' मध्ये उच्च दर्ज्याचे ३ डी टेक्निक आणि संगणक ग्राफिक्स चा उत्तम उपयोग केलेला दिस्तो. 

 

मित्रानो, आता 'महेश कोठारे' म्हणून महेश कोठारेंचे संबोधन इथेच संपवते बरं का? इतका वेळ मी केवळ एक उत्कृष्ट निर्माते आणि दिग्दर्शक 'महेश कोठारे' बद्दल बोलत होते ज्यांच्या बद्दल असंख्या टी. व्ही. वाहिनी आणि असंख्य मासिक, वूत पत्रात म्हटले गेले आहे. आपल्याला सर्वाना त्यांची खाय्ती माहीतच आहे आणि मी काही नवीन सांगत नाहीए. परंतु सांगितल्या शिवाय राहवत सुद्धा नाही. इतर त्यांना महेशजी, कोठारे साब, किव्हा महेश सर म्हणून संबोधित करत असतील आणि त्यांच्या बद्दल खूप काही लिहिले सुद्धा असेल. परंतु ह्या पुढे मी तसे करणार नाही. कारण येव्डेच की ते आपल्या परिवाराचा हिस्सा आहेत आणि आपल्या माणसांना आपण घरच्या माणसां सारखेच संबोधिले पाहिजे, नाही का? मी त्यांच्या पुढे बरीच लहान असल्यामुळे ह्या पुढचा उल्लेख महेश मामा म्हणूनच करावासा वाटतो.  

 

७ जुन २०१३ ला 'झपाटलेला २' प्रदर्शित झाला आणि दुसर्या दिवसा पासूनच 'फेसबुक' वर महेश मामानी मराठी श्रोत्यांना झपाटून टाकल्याची बातमी कळली. मी चित्रपट प्रेमी नसून सुद्धा महेश मामाचा चित्रपट पाहणे माझ्या साठी अत्यंत गरजेचे होते. मुलांना घेऊन दुपारच्या शो ला गेले. अपेक्षा भरपूर होत्या ह्या चित्रपटातून परंतु चित्रपटाच्या सुरुवाती पासून एक समीक्षक म्हणून त्या चित्रपटाकडे पाहत होते. कोठारे परिवाराच्या प्रत्येक सिनेमाला मी कायम एका समीक्षकेच्या नझरेतून पहिले आहे आणि त्यातले गुण दोष कळवले आहेत. त्यामुळे चित्रपट सुरु होताच माझ्यातली टीकाकार जागी झाली परंतु पहिल्या प्रवेशानीच आपला ठसा उमटवला. 'कुबड्या खवीस' चा त्या संग्रहालयात ला ३ डी प्रवेश उत्कृष्ट होता. त्या पुढे अपेक्षा वाढत गेली आणि ती महेश मामानी पूर्णपणे सार्थ केली. कसलीच कमी वाटली नाही आणि चित्रपट गृहात आलेयांची सकारात्मक प्रतिक्रिया ऐकून त्यांचा अधिकच अभिमान वाटू लागला. मुलांना सुद्धा चित्रपट इतका आवडला की घरी आल्या बरोबर बाबांनी सुद्धा पहिलाच पाहिजे म्हणून रात्रीच्या शो ला जाऊ असा आग्रह चालू होता. हीच खासियत असते महेश मामाचं चित्रपटांची कि ते सर्व वयोगट मजेत पाहू शकतात आणि कितीही वेळा पहिले तरी तेव्दाच आनंद लुटू शकतात. 

 

ह्या चित्रपटात अजून एक महत्वाची गोष्ट होती जी मला पाहण्यात उत्सुकता होती आणि ती म्हणजे आदिनाथ कोठारे ची भूमिका आणि त्याचे काम. आदि चे प्रत्येक काम मी पाहिले आहे आणि त्याची अभिनयाची स्वाभाविक कल सुद्धा पाहिली आहे. परंतु प्रत्येक नवीन नायकाला आपले स्थान कायम ठेवायला असंख्य अश्या परीक्षा द्याव्या लागतातच. आदिचा प्रवास बरीच वर्ष चालू आहे आणि त्याच्या प्रगतीचा ठसा तो त्याच्या प्रत्येक भूमिकेतून  देत आलाय. त्याची हीच प्रगती प्रत्यक्षात पहायची होती आणि अभिमान वाटतो हे घोषित करताना कि आदिनाथ कोठारे यांनी 'झपाटलेला २' मध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे आणि एक 'chocolate boy' म्हणून प्रत्येक तरुणीच्या मनात घर करून गेला आहे. तरुण मुलीच कशाला, लहान मुला मुलीन कढून सुद्धा आदिनाथ कोठारे चे नाव ऐकून बरे वाटते. अतिशय देखणा त्याच बरोबरीने सोज्वळ असे व्यक्तिमत्व असलेला आदि ह्या सिने सृष्टीत स्वतःचा अस्तित्व कयाम करेल ह्याची खत्री आहे. 'ऑल ध बेस्ट' सारख्या यशस्वी नाटकाचे असंख्य प्रयोग करून आदि ने कॉमेडीची timing बर्या पैकी साधली. चित्रपटाच्या शेवटी आदि आणि तात्या विंचू ची लढाई अतिशय सुंदर रीत्ये चित्रित केली आहे आणि त्यात आदिचे विशेष कौतुक करावेसे वाटते.  आपल्या मराठी सिने सृष्टीला ज्या नायकाची कमी भासत होती ती आता आदि पूर्ण करेल ह्यात शंका नाही. 

 

टी .व्हि. वरच्या एका मुलाखतीत महेश मामा आणि आदि ला मराठी सिने सृष्टीतले अमिताभ - अभिषेक म्हटले गेले. परंतु मी ह्या मताशी सहमत नाही. महेश मामा एक अप्रतिम दिग्दर्शक आहे ज्याला उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून फिल्म फ़ैर, स्क्रीन आणि महाराष्ट्र राज्य चे विविध पुरस्कार मिळाले आहेत. २००९ साली मराठी सिने सृष्टीला लक्षणीय योगदान केल्या बद्दल महाराष्ट्र राज्याने महेश कोठारेंचा गौरव केला. त्यामुळे एक उत्कृष्ट निर्माते दिग्दर्शक म्हणून त्यांचे नाव घेणे योग्य ठरेल आणि राज कपूर, मनमोहन देसाई, ह्रीशिकेश मुखर्जी सारख्या दिग्दर्शकांच्या नवा बरोबर त्यांचे नाव घ्यायला काहीच हरकत नाही. महेश मामा नी मराठी सिनेमात अजून एक लक्षणीय वेगळेपणा केला. त्यांनी त्याच्याच चित्रपटाचा दुसरा भाग बनवला आणि त्याच बरोबरीने 'तात्या विंचू' ला जिवंत ठेऊन श्रोत्यांची उत्सुकता आणि अपेक्षा अजून वाढवली आहे.  चित्रपट गृहातून बाहेर येताना प्रत्येक जणांनी 'झपाटलेला ३' ची वाट बघण्याचे व्यक्त केले. ज्या रीतीने 'झापालेला २' नी सर्वांना झपाटून टाकले आहे त्याच झपाट्याने महेश आणि आदिनाथ कोठारे च्या प्रत्येक चित्रपटाला अशीच लोकप्रीयता मिळावी, अधिकाधिक पुरस्कार आणि जनतेच्या प्रेमाचा वर्षाव होवो हीच सदिच्छा.