मित्र
मुलांचे वाढदिवस जवळ आले की मित्र मैत्रिणींची यादी बनवण्या पासून जय्यत तयारी सुरु होते. पण मजेशीर गोष्ट म्हणजे त्या यादीतली 'बेस्ट फ्रेंड्स' ची नावे दर वर्षी बदलत असतात. दर वर्षी कशाला, रोजच त्यांचे 'बेस्ट फ्रेंड्स' बदलतात हे पाहून हसू येतं. त्या निरागस वयात 'मित्र' ह्या शब्दाचा अर्थच मुळात त्यांना कळत नसतो. आज कोणी चांगला वागला तर तो आपला 'बेस्ट फ्रेंड', दुसर्या दिवशी वाईट वागला की त्याचे 'बेस्ट फ्रेंड' च्या यादीतून नाव वगळले जाते आणि तिसर्या दिवशी एक नवीन 'बेस्ट फ्रेंड' उगवतो. त्या वयात कुणाला ठाऊक असतं 'मित्र' कुणाला म्हणतात.
आई बाबा लहानपणा पासूनच आपली काळजी घेत असतात आणि सावध करत असतात की मित्र चांगले बनवा कारण आपल्या संगोपनावर संगतीचा फार मोठा प्रभाव पडतो आणि आपले व्यक्तिमत्व आपल्या मित्र मंडळींवर अवलंबून असते. मुलगा वाईट मार्गाला लागला की लग्गेच निष्कर्ष केला जातो की त्याची सांगतच वाईट असणार. त्यामुळे मित्र 'चांगले' बनवा अशी ताकीद लहान पणा पासूनच दिली असते. आपण कितीही सावध राहिलो तरी कोणी आपल्या आयुष्यात येणे आणि जाणे हे आपल्या हातात नसते कारण तो आपल्या नशीबाचा भाग असतो आणि पूर्व जन्माचे भोग.
आपल्या आयुष्यात येणारे आपले मित्र अश्या व्यक्ती असतात ज्यांच्याशी आपले रक्ताचे नाते नसते तरी रक्ताच्या नात्याहून पक्के असे नाते जुळून येते. आपल्या आयुष्यातले सुखाचे क्षण साजरे करायला दुनिया उभी राहते पण दुख वाटून घेणार्यांना 'मित्र' असे म्हणतात. छोट्या मोठ्या गोष्टी असो किंव्हा आयुष्यातला सर्वात गंभीर विषय. कोणत्याही विषयावर ज्याच्या जवळ मनमोकळे करता येते, तो 'मित्र'. 'मित्र' आपल्या पोरकट किंव्हा अर्थशुन्य गप्पान मध्ये सुधा तेवद्याच उत्साहाने भाग घेतो त्यामुळे त्याच्याशी कोणत्याही विषयावर बोलायला कसलीच लाज किंव्हा संदेह वाटत नाही.
आपल्या बर्याच जणांचे लहानपण, मित्र आणि आपल्या चुलत, मावस, मामे भावंडान बरोबर अतिशय मजेत गेले असणार,नाही का? आपल्याला ते सुंदर दिवस आठवतही असतील कारण आपल्या नकळत, तेव्हा आपण कदाचित त्यांच्याशी एका मित्रा सारखेच वागत असु. धमाल मस्ती, राग रुसवे, चेष्टा मस्करी आणि लाड प्रेम सुद्ध. सर्व अविस्स्मारानिया आठवणी आपण मनाच्या ओंजळीत घेऊन मोठे होतो. तेव्हाचा राग रुसवा कधीच मनाला लागलेला नसतो कारण तेव्हा केवळ मैत्रीचे नाते जुळलेले असते. मित्रांच्या बोलण्याचे जसे वाईट वाटत नाही तसे बहिण भावंडांचे सुद्धा कधीच मनाला लागत नाही. जेव्हा मैत्री मिटून एक नातेवाईक म्हणून आपण भेटत जातो, तेव्हा त्या नात्यातली मैत्री कुठे तरी हरवून जते. त्या 'मैत्री' चा सहवास मिटून जातो आणि राहतात ती फक्त नवा पुरती नाती.
नात्यापेक्षा मैत्रीला महत्व दिलेले आमच्या घरी चालत नसे त्यामुळे मित्रांना नातेवाईकांना पेक्षा अधिक महत्व देण्याची परवांगी न्हवती. परंतु जे नशिबात लिहिले गेले आहे ते कोणीच बदलू शकत नाही. त्यामुळे अश्या काही भावंडांशी जवळीक झली ज्यांना सुद्धा नात्या पेक्षा मैत्रीवर विश्वास आहे. असे नाते जुळले त्यांच्याशी की बहिण भावाचे नाते राहिले बाजूला, आम्ही भेटतो ते केवळ 'मित्र' ह्या नात्यानी. एकमेकांच्या सुख दुखात हक़्क़ाने सहभागी होणारे असे मित्र. राग रुसवा मनाला न लावता गैर समज एकत्र बसून दूर करणारे हे मित्र. अश्या मित्रां मुळे नाती जपली जातात आणि आनंद द्विगुणीत होतो.
मुलांच्या त्या 'बेस्ट फ्रेंड' च्या यादी वरून मला माझ्या 'बेस्ट फ्रेंड्स' ची आठवण झाली. 'बेस्ट फ्रेंड्स' ची यादी कधीच लांब लचक नसते हे मुलांना त्यांचा स्वानुभवाच शिकवू शक्तो. शाळेत आणि कॉलेजात असताना "ते दोघे" कधीच माझे 'बेस्ट फ्रेंड्स' न्हव्ते. आमची मैत्री फुलली ती वर्षा नु वर्षाच्या सहवासानी. एकमेकांचे दोष जाणून सुद्धा जेव्हा आपण एकमेकाना 'मित्र' म्हणून स्वीकारतो तोच खरा मित्र. फोनेवरच्या आवाजावरून मनस्थिती ओळखणारे हे मित्र. दुखाची चाहूल लागताच दारात उभे राहणारे हे मित्र. रडता रडता हसवू शकणारे हे मित्र. प्रत्येक दोष जाणून सुद्धा प्रेम करणारे हे मित्र. क्षणात खोटेपणा पकडणारे हे मित्र. ह्यांच्या पासून दुख लापावूच शकत नाही आणि सुखाची बातमी पहिला त्यांना कळवल्या शिवाय चैन पडत नाही. आयुष्याच्या प्रत्येक वाटचालीवर ज्यांची साथ हवीहवीशी वाटते असे हे मित्र. ह्यांना पाहिले कि मनात एकाच विचार येतो, "ये रिश्ता क्या केहेलाता है? "
हे नाते असते विश्वासाचे, हे नाते असते प्रेमाचे. खर्या प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असते त्या मित्रांची. असा अजून एक खास मित्र माझ्या आयुष्यात आला. २० वर्षां पूर्वीची ती ओळख. हसरा, मनमिळावु आणि अतिशय नम्र असे व्यक्तिमत्व. मदतीचा आणि मैत्रीचा हाथ कायम पुढे ठेवणारा असा माझा सर्वात खास मित्र. माझ्या प्रत्येक वागणुकीला समंजस पणे हाताळणारा हा मित्र. प्रत्येक चूक समजावून, माझे मत परिवर्तन करून, कोणतीही परिस्थिती योग्य रित्य सांभाळणारा हा मित्र. आमच्या आवडी सारख्याच असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत धमाल मस्ती असतेच. मित्रां मध्ये केवळ प्रेम असून मजा नाही. त्या नात्याला कायम सतेज ठेवण्यासाठी थोड्या लढाईची सुद्धा गरज भासते. आमची सर्वात मोठी लढाई होते चित्रपटावरून. त्याला प्रत्येक चित्रपट पहायची आवड आणि मला त्या चित्रपट गृहात ३ तासांचा मौल्यवान वेळ वाया घालवणे, म्हणजे 'त्या' वेळेचा अपमान केल्या सारखे वाटते. तरी कोणत्याही लढाई नंतर प्रेमानी समजूत काढणारा हा मित्र.
कधीतरी विसरायला होते की ह्या मित्राशीच आपले लग्न झाले आहे आणि त्याला सगळ्या गोष्टी सांगायला नको. परंतु ही मैत्रीच येवडी खास आहे की नवरा बायकोच्या नात्याला सुद्धा एक वेगळाच ताजेपणा येतो. 'मैत्रीत एवडे सामर्थ्य आहे की ते कोणतेही नाते फुलवू शकते आणि ते आयुष्यभर तसेच तेजस्वी राहू शकते. मित्रांशिवाय आयुष्य रटाळ होतं ह्यात शंकाच नाही. 'मित्र' हे माझ्या जीवनाचा अतिशय महत्वाचा भाग तर आहेतच आणि त्यांच्या शिवाय जीवन म्हणजे जिवंत पणे मेल्या सारखे.
अशी मैत्री जपणारी आणि मित्रांचे महत्व जाणणारी काही माणसे भेटली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ती 'सासरची माणसे' आहेत. 'नवरा' माझा 'बेस्ट फ्रेंड' आधी पासूनच होता परंतु असेही नातेवाईक भेटले ज्यांनी एकेरी नावानी संबोधीत करण्याची परवांगी दिल्ली आणि मैत्रीचा हाथ पुढे केला. लग्न झाल्या बरोबर एका नवीन सुनेला ह्याच्याहून जास्त कोणी काय देऊ शकतं? प्रचंड आनंद झालेला ह्या नवीन मित्रांना भेटून आणि अजूनही त्यांच्या त्या मैत्रीला माझा सलाम.
इतक्या वर्षांच्या अनुभवातून हे जाणवले की कोणतेही नाते जपण्या साठी मैत्रीचे नाते जुळून येणे अतिशय महत्वाचे आहे. 'मैत्रीचे' नाते कधी मागून मिळत नाही. ते नाते मनाचे असते. मन जुळली की मैत्री होते आणि प्रेमाचे असे एक अतूट नात जुळून येते. ह्यात एकच धोका असा कि, मैत्री करणाऱ्यांचे मन कितपत साफ आहे हे कसे कळणार? कोणी स्वार्थासाठी मैत्री करण्याचे ढोंग करतात किव्हा अजून काही कारणा मुळे . आज 'फेस बुक' वर माझी मित्रांची यादी ७००- ८०० च्या घरात जरी असली तरी त्यातले किती मित्र खरे आहेत हे मी जाणून आहे. मित्र म्हणून बरेच हाथ पुढे करतात परंतु त्यांना 'मित्र' असे म्हटले तर 'मित्र' ह्या शब्दाचा अपमान होईल. मैत्री, एक प्रकारची जबाबदारी असते हे बर्याच लोकांना माहित नाही. केवळ 'मित्र' आहोत असे म्हटले म्हणजे कोणी मित्र बनू शकत नाही. त्यासाठी 'मैत्री' सिद्ध करून दाखवावी लागते आणि ती वर्षानुवर्षाच्या सानिध्याने आणि अनुभवातूनच आपली जागा कायम राखू शकते.
ह्या सगळ्या गोष्टी कुणाला सांगून किव्हा समजावून समजण्या सारख्या नाहीत. ह्या गोष्टी केवळ तेच समजू शकतील ज्यांनी 'मैत्री' करून ती निभावली आहे आणि ज्यांना मित्रांची खरी ओळख पटली आहे. 'मैत्री' तेव्हाच फुलते जेव्हा त्या मित्रांमध्ये 'प्रेम' असतं. 'प्रेमाशिवाय ती मैत्री टिकूच शकत नाही कारण आपण एखाद्या व्यक्ती साठी वाट्टेल ते करून त्या व्यक्तीला खुश ठेवतो जेव्हा आपण त्या व्यक्तीवर अतिशय प्रेम करत अस्तो. प्रत्येक नात्याची सुरुवात ही मैत्रीतूनच होत असते आणि तीच नाती वर्षानुवर्ष जोपासली जातात. देव कृपेने असे खूपच प्रेमळ 'मित्र' मला बर्याच रुपात भेटले ज्यांच्या सानिध्यात राहून आयुष्याच्या कोणत्याही अडथल्याना सामोरे जाण्यासाठी मी सशक्त झाले. माझ्या आयुष्यात ह्या सर्व मित्रांची उपस्थिती अतिशय महत्वाची आहे. मनात आलेली कोणतीही नकारात्मक भावना कायमची मिटून टाकण्यात ह्या सर्व मित्रांचा सिंव्हाचा वाटा आहे हे मी कधीच विसरणार नाही. माझ्या आयुष्यात आलेल्या माझ्या प्रत्येक मित्राला माझा प्रेमाचा सलाम.
No comments:
Post a Comment