Wednesday, May 19, 2021

महेश कोठारे - एक धडाकेबाज व्यक्तिमत्व !

            



महेश कोठारे ! नाम तो सूना ही होगा !!!हे नाव केवळ महाराष्ट्रापुरते परिचित नाही तर देशभर प्रसिद्ध आहे. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की एक परभी नाव इतके प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले. त्यांचे असंख्य चाहते जगभर पसरले आहेत आणि त्यांच्या इतक्या वर्षाच्या  कामगिरीबद्दल त्यांना सन्मानितही केले गेले आहे. ह्या सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत कारण महेश कोठारे यांच्या असंख्य मुलाखती झाल्या आहेत आणि तशीच त्यांच्याबद्दल सर्व माहिती इंटरनेट वर उपलब्ध आहे.

आपल्या पाठारे प्रभू ज्ञातीतपण घरोघरी महेश कोठारे बद्दलची माहिती आहे, मग ती व्यावसायिक पातळीवर असो कींव्हा खाजगी. कुणाचा भाऊ तर कुणाचा मित्र, कुणाचा भाचा तर कुणाचा पुतण्या, कुणाचा मामा तर कुणाचा काका. त्यामुळे मी असे वेगळे काय सांगणार? तुम्हा सर्वाना सगळं माहीत असूनसुद्धा मी महेश कोठारे बद्दल असे वेगळे काय लिहिणार असे तुम्हाला वाटणे स्वाभाविक आहे.

महेश कोठारे पुनः एकदा चर्चेत आहेत कारण द ब्लॅक लेडी पुनः एकदा त्यांच्याकडे आली आहे आणि त्यांना ह्या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. १९८६ मध्ये महेश कोठारे यांना २ Filmfare चे अवार्ड्स मिळाले होते त्यांच्या धूमधडाका चित्रपटासाठी, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि आता २०२१ मध्ये त्यांना सन्मानित केले आहे फॉर Excellence in Cinema’.

बाल कलाकार म्हणून १९६४ मध्ये छोटा जवान ह्या चित्रपटासाठी त्यांना विशेष पारितोषिक दिले गेले होते. त्यांनी जेवढे चित्रपट बाल कलाकार म्हणून केले ते सर्वच सुपर हिट ठरले. त्या नंतर प्रीत तुझी माझी मधून अवघ्या विसाव्या वर्षात प्रथम नायकाच्या भूमिकेत ते दिसून आले. शिक्षण आणि वकिलीचा व्यवसाय सांभाळून त्यांनी नायक म्हणून बरेच चित्रपट केले आणि त्या दरम्यान एका चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमीका देखील साकारली आणि त्या भूमिकेला  देखील त्यांनी अगदी योग्य न्याय दिला.

एक बाल कलाकार ते नायक, खलनायक अश्या भूमिका सकारल्यावर त्यांनी झेप घेतली धूम धडका ह्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करून आणि त्यांतून सुरुवात झाली एका प्रगल्भ निर्माते आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेची. धूम धडाका पासून त्यांनी मराठी चित्रपटांचा ट्रेंड बदलून टाकला आणि मराठी तरुण पिढीला चित्रपटगृहात यायला आकर्षित केले. महेश कोठारे यांचा formula सुपर हिट ठरला आणि त्यापुढे त्यांनी असे बरेच विनोदी चित्रपट निर्मित आणि दिग्दर्शित केले जे भरगोज यायशस्वी ठरले.

आपण जेव्हा महेश कोठारे यांच्या चित्रपटांकडे पाहतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते आणि ती म्हणजे महेश कोठारे नी मराठी सिनेसृष्टिला प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांचा तो प्रयत्न यशस्वी ठरला आहे. त्यांनी मराठी सिनेमा ला बऱ्याच नव्या गोष्टी दिल्या आहेत. त्यांचा धडाकेबाज चित्रपट मराठी सिने सृष्टिचा पहिला Cinemascope चित्रपट आहे. ह्याच चित्रपटात त्यांनी special effects चा देखील यशस्वीरित्या प्रयोग केला.  

त्या नंतर ही त्यांनी प्रत्येक चित्रपटात काहीतरी नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि देवाच्या कृपेने तो प्रयत्न यशस्वी ठरला आहे. तसेच चिमणी पाखरे ह्या त्यांच्या सिनेमात त्यांनी प्रथमच मराठी सिनेमात Dolby sound आणला. त्यांच्या पछाडलेला चित्रपटात महेश कोठारे यांनी प्रथमच Computer generated effects आणले तर झपाटलेला - मध्ये त्यांनी 3D तंत्रज्ञानाचा उपयोग केला आणि मराठी सिनेमा ला तीचा पहिला मराठी 3D चित्रपट दिला. त्यांचे हे सगळेच प्रयोग यायशस्वी ठरलेले आहेत. केवळ सिनेसृष्टि न्हवे तर छोट्या परड्यावरच्या त्यांच्या सर्वच मालिका यशास्वी ठरल्या आहेत.   

महेश कोठारे यांचे मराठी सिनेसृष्टीतले योगदान आणि विक्रम इतिहासात जमा झाले आहेत जेणेकरून आपल्यालाच नाही पण आपल्या पुढच्या पीढीला देखील एका पाठारे प्रभूचे मराठी सिनेसृष्टीतले योगदान पाहून अभिमान वाटेल. ह्या योगदानामुळे त्यांना हे बहुमूल्य पारितोषिक फॉर ‘‘Excellence in Cinema’ बहाल करणे स्वाभाविकच आहे आणि त्यासाठी मलाच नाही तर आपल्या संपूर्ण ज्ञाती ला त्यांचा अभिमान असायला पाहिजे.

ही झाली ह्या वर्षाची ताजी बातमी जी मी एक सह संपादिकेच्या भूमिकेतून साकार केली परंतु काही गोष्टी आहेत ज्या मी एक पत्रकार म्हणून न्हवे तर महेश कोठारेंची फॅन म्हणून निभावू शकेन असे मला वाटते कारण एका कलाकाराला योग्य मान आणि प्रेम केवळ त्याचा चाहता म्हणजेच त्याचा फॅन देऊ शकतो. आम्ही एकाच तळपदे कुटुंबाचा भाग असल्यामुळे अर्थातच आमच्या घरी महेश मामा बद्दल चर्चा व्हायच्या आणि लहानपणापासूनच मी आपल्या सुपरस्टारची फॅन झाले.

शाळेत असतानाच मला कळले की महेश कोठारे हे नाव किती प्रसिद्ध आहे. तेव्हा धूमधडका चर्चेत होता आणि त्या वेळेस मराठी चित्रपट जरी असला तरी माझ्या अमराठी मैत्रिणींनी धूम धडाका पाहिलेला आणि महेश कोठारे हे नाव माझ्या मैत्रिणीं मध्ये सुद्धा परिचित होते आणि त्यांचे सर्वच चित्रपट लोकं आवडीने पहायला जायचे ह्याच मला लहानपणापासूनच अभिमान होता. मी आजपर्यंत केवळ तीन फॅन मेल पाठवले आहेत आणि माझे पहिले फॅनमेल माझ्या वयाच्या 12व्या वर्षी मी महेश मामाला पाठवलेले त्यांची Khaitan Fan म्हणून.    

माझ्या मैत्रिणींचा महेश कोठारे बद्दलचा आदर पाहून मला एक गोष्ट लक्षात आली की, जितका संमान परकी माणसं देतात तितकी आपली माणसं देत नाहीत. कारण एखादी व्यक्ति यशस्वी व्हायला लागली की त्या व्यक्तिबद्दल प्रशंसा सोडा, निंदा जास्त ऐकण्यात येतात आणि आश्चर्य म्हणजे मराठी माणसंच मराठी माणसांची निंदा कारायला पुढे असतात.

निंदकाचे घर असावे शेजारी, असे म्हणतात खरे परंतु कायम जेव्हा केवळ निंदाच करतात तेव्हा लक्षात येतं की लोकांना केवळ टीका करता येते. प्रशंसा करायला मोठे मन लागते जी फारच दुर्लभ गोष्ट आहे. कधीतरी शंका येते की हा दोष केवळ आपल्या मराठी माणसातच आहे की काय. वी चंद्रशेखर गोखले यांनी कीती योग्य म्हटलंय, चढाओढ या शब्दाचा अर्थ आपण कीती उलट लावतो, कोणी वर चढताना दिसला, कि लग्गेच खाली ओढायला धावतो. 

मला अजूनही कळत नाही की, आपलं समजून कोणी का साथ देत नाही? टीका करणाऱ्यांनी एवढा तरी विचार करावा की आपण तेवढे तरी करू शकतो का जे त्या व्यक्तीने केले आहे? एक फॅन म्हणून मला ह्या गोष्टींचा प्रचंड राग येतोच परंतु जास्त राग ह्या गोष्टीचा येतो की आपल्या माणसांबद्दल कोणी टीका का करावी? प्रोत्साहनाची पहिली थाप जेव्हा आपल्या माणसांकढून येते तेव्हा स्वतःवरचा विश्वास अजूनही भक्कम होतो. एखादी व्यक्ति त्याचा बळावर पुढे येते, प्रचंड परिश्रम घेऊन बरेच पडाव पार करून आपले नाव कामावते परंतु त्या परिश्रमाला नजरेआड करून लोकांना केवळ टीका करण्यात स्वारस्य असते ही फाराच लज्जास्पद गोष्ट आहे.  

महेश कोठारे यांची हल्लीच झालेली एक मुलाखत मी यू ट्यूब वर पाहिली आणि ती पाहून त्यांच्याविषयी अभिमान द्विगुणित झाला. मी महेश कोठारे यांना एका वेगळ्या दृष्टीने पाहिले. एक अतिशाय Down to Earth’ व्यक्तिमत्व समोर आले जे मला खरोखर अपेक्षित नव्हते.  आपली Success story सगळेच सांगतात परंतु आपले अपयश social media वर जाहीर स्वीकारणे फार कमी. आपल्यातही काही दुर्बलता आहे हे मान्य करणारे महेश कोठारे दिसले परंतु आपल्या सामर्थ्याला जोपासून पुढे जाऊन सर्व अडथळ्यांवर मात करून जिंकणारे महेश कोठारेही दिसले आणि त्याचक्षणी ते, धडाकेबाज ठरले. ह्या माणसांत मी साहस पाहिला, जगाशी भिडण्याची ताकद पाहिली आणि जी गोष्ट मला सर्वात आकर्षित करते, ती म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा दिसला. एका pheonix पक्षासारखी त्यांची भरारी पाहिली. ज्या साहसाने त्यांनी सर्व अडथळ्यांना पार केले आणि आज हा मुक्काम गाठला, त्या बद्दल अभिमान वाटला.

महेश कोठारे यांनी मराठी सिनेसृष्टिला जे योगदान दिले आहे ते अमूल्य आहेच आणि जो पर्यंत मराठी सिनेसृष्टि आहे तो पर्यंत तरी त्यांचे नाव अमर आहे. महेश कोठारे आम्हाला तुमचा प्रचंड अभिमान आहे. तुमचे मनापासून अभिनंदन. तुम्हाला तुमच्या पुढ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या Fans ची संख्या वाढत जावो हीच सद्दीछा. परंतु तुमचा Khaitan Fan कायम एकच हां ... संजना उर्फ मिनोती कोठारे!!! नाम तो सुना होगा???  

 

4 comments:

  1. Very nicely covered. Mahesh deserves this and much more.

    ReplyDelete

  2. खूप छान लिहिलंय संजना. सिनेसृष्टीतील्या या थोर कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much Sameera. Appreciate your feedback. Means a lot to me. :)

      Delete